Malaika Arora Taunt On Arbaaz Khan: बॉलिवूडची (Bollywood News) मुन्नी म्हणजेच मलायका अरोरा (Malaika Arora), आजही अनेकांच्या गळ्यातील ताईत आहे. वयाची पन्नाशी पार केलेली मलायका अरोरा आजही भल्याभल्या तरुणींना टक्कर देते. मलायकानं 1998 मध्ये अरबाज खानशी (Arbaaz Khan) लग्न केलं. पण, 2018 मध्ये दोघांच्या नात्यात मिठाचा खडा पडला आणि दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, मलायका अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती, तर अरबाज खाननं शुरा खानशी दुसरं लग्न केलं. अलिकडेच, मलायकानं घटस्फोट आणि अफेअर्सच्या मुद्द्यावर महिलांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, अरबाज खानचं नाव न घेता तिनं लहान वयाच्या तरुणींशी लग्न करणाऱ्या पुरूषांवर निशाणाही साधला आहे.
मोजो स्टोरीसाठी बरखा दत्त यांच्याशी बोलताना, मलायका अरोरा म्हणाली की, "तुम्ही नेहमीच बलवान आहात म्हणून तुमचं मूल्यांकन केलं जातं. आम्हाला नेहमीच असं मत मिळत राहील. मला पुरुषांबद्दल खूप आदर आणि प्रेम आहे, कारण माझ्या आयुष्यात काही पुरुष खूप महत्वाचे आणि अद्भुत राहिले आहेत...."
तुमच्यापेक्षा वयानं अर्ध्या असलेल्या तरुणीशी लग्न करणं... : मलायका अरोरा
मलायका अरोरा म्हणाली की, "आज जर एखाद्या पुरूषानं पुढे जाण्याचा, घटस्फोट घेण्याचा आणि त्याच्या अर्ध्या वयाच्या महिलेशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, तर ते म्हणजे, व्वा, काय पुरूष आहे... पण जेव्हा एखादी स्त्री असंच करते, तेव्हा तिला प्रश्न विचारले जातात की, ती असं का करतेय? तिला समजत नाही का? रूढीवादी विचार कायम आहेत..."
मलायकाला आईनं दिलेला लाखमोलाचा सल्ला
मलायकानं पुढे बोलताना सांगितलं की, ज्यावेळी तिनं वयाच्या 25व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला, त्यावेळी तिची आई फारच हैराण झालेली. तिनं सांगितलं की, "माझी आई नेहमीच म्हणायची की, बाहेर जा, आपलं आयुष्य एन्जॉय कर आणि प्लीज पहिल्या व्यक्तीशी लग्न करू नकोस, ज्याच्यासोबत तू डेटवर गेलीयस... मी अगदी तसंच केलेलं... मी त्याच मुलाशी लग्न केलं, ज्याच्यासोबत मी डेटवर गेलेले... मी असं का करेन, हे तिला समजत नव्हतं..."
अभिनेत्रीनं पुढे म्हटलंय की, "जर तू असं केलंस तर जगात काय आहे, हे तुला कसं कळेल?" आणि मी म्हणायचे, "आई, आता शांत हो..." पण ती नेहमीच आम्हाला जगायला आणि स्वप्न पाहायला प्रोत्साहित करायची. तिनं आम्हाला कधीही काहीही करण्यापासून रोखलं नाही."
महत्त्वाच्या इतर बातम्या :