Sachin Pilgaonkar On His New Car: मराठी मनोरंजनविश्वात (Marathi Industry) 'महागुरू' म्हणून ओळखले जाणारे सचिन पिळगांवकर (Sachin Pilgounkar) त्यांच्या काही आठवणी मुलाखतींमध्ये सांगत असतात. अगदी बालवयातच त्यांनी सिनेसृष्टीत काम करायला सुरुवात केली. अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, गायक, डान्सर म्हणून ओळखले जाणारे सचिन पिळगांवकर यांनी हिंदी, मराठीतील अनेक सिनेमांमध्ये मोलाची भूमिका साकारली. त्यांनी 'नदिया के पार', 'बालिका वधू', 'पारध', 'बचपन', 'ब्रह्मचारी', 'सत्ते पे सत्ता' यांसारख्या बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकले. तर, 'अशीही बनवा बनवी', 'नवरा माझा नवसाचा', 'आयत्या घरात घरोबा' यांसारख्या अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलंय. सध्या त्यांच्या अनुभवांचे किस्से सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. असाच एक नवा किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत सचिन पिळगांवकरांनी त्यांनी त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा विकत घेतलेल्या गाडीचा किस्सा सांगितला. 

Continues below advertisement

ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी त्यांची लेक श्रिया पिळगांवकरसोबत (Shriya Pilgaonkar) Mashable India ला मुलाखत दिलेली. यावेळी मुलाखतीमध्ये सचिन पिळगांवकर यांनी त्यांनी त्यांच्या आयुष्यातली पहिली गाडी वयाच्या 9व्या वर्षी विकत घेतल्याचं सांगितलं. तसेच, नऊ वर्षांचे असतानाच त्यांनी ती गाडीही चालवायला शिकले, असंही ते म्हणालेत. सचिन पिळगांवकरांच्या या वक्तव्यानंतर त्यांची लेक श्रिया पिळगांवकरनं दिलेली प्रतिक्रिया सध्या जोरदार चर्चेत आहे. 

सचिन पिळगांवकर काय म्हणाले? 

मुलाखतीत बोलताना सचिन पिळगांवकर म्हणाले की, "मी 9 वर्षांचा होतो, त्यावेळी आताचा हा सी-लिंक नव्हता. मी तेव्हा टायकल वाडी इथे राहायचो. टायकलवाडी शिवाजी पार्क इथे येतं. मी 9 वर्षांचा होतो, तेव्हा मी पहिली गाडी खरेदी केली. तिल मॉरिस माइनर बेबी हिंदुस्थान म्हणायचे. या गाडीला बकेट सीट आणि फ्लोअर शिफ्ट गिअर होते. ही पेट्रोलवर धावणारी गाडी होती".

Continues below advertisement

यावेळी मुलाखतकारनं सचिन यांना विचारलं की, "तुम्ही ती गाडी चालवायचे कशी?" तर सचिन पिळगांवकर म्हणाले की, "नाही ड्रायव्हर होता. पण, मी 9 वर्षांचा असताना, याच वरळी सीफेसवर त्या गाडीमधून गाडी चालवायला शिकलो..." सचिन पिळगांवकरांनी फक्त नऊ वर्षांचे असताना गाडी खरेदी केल्याचं ऐकून मुलाखतकाराला धक्का बसलाच. पण, मुलाखतीत सचिन पिळगांवकरांसोबत उपस्थित असलेली त्यांची लेक श्रिया पिळगांवकरलाही धक्का बसला. बरं श्रियानं तिच्या वडिलांचा किस्सा ऐकला आणि तिला धक्का तर बसलाच, पण मुलाखतीत  हसूही आवरता आलं नाही. श्रिया वडिलांनी सांगितलेला किस्सा ऐकून ऑन कॅमेरा फिदीफिदी हसली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Ashok Saraf On Sachin Pilgaonkar: 'सचिनसोबत माझी कधीच मैत्री नव्हती, त्याच्या...'; अशोक सराफ यांनी सगळंच स्पष्ट केलं