Horoscope Today 4 December 2025 : वैदिक पंचांगानुसार, आज 4 डिसेंबर 2025, आजचा वार गुरुवार आहे. आज मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार देखील आहे. तसेच, आजचा दिवस फार खास असणार आहे. कारण आजच्या दिवशी दत्त जयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा आहे. त्यामुळे आजच्या दिवसाला फार महत्त्व आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
विद्यार्थ्यांना शिक्षणात अडथळे येतील महिलांनी कोणावरही विश्वास ठेवू नये.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
आज सावधानता आणि चिकाटीने कामाचे डोंगर उपसाल.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
जवळच्या व्यक्तींवर नको एवढा विश्वास टाकू नका काही वाद विकोपाला जाऊ शकतात.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
अपेक्षा ठेवल्या नाहीत तर अपेक्षाभंगाचे दुःख जाणवणार नाही.
सिंह रास (Leo Horoscope Today)
बोलताना विचार करा बोलून विचारात पडू नका आर्थिक दृष्टीने फसवणूक होण्याची शक्यता आहे.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
वैवाहिक जीवनाचा प्रांत नाजूक आणि बिकट झालेला जाणवेल थोडी तडजोड करावी लागेल.
तूळ रास (Libra Horoscope Today)
तरुण वर्गाचे विवाह ठरताना अडचणी येण्याची शक्यता आहे व्यवसायात ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या मिळणार नाहीत.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
अतिशय धोरणी पणाने पक्के आणि स्थायी स्वरूपाचे यश मिळवाल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
नोकरी व्यवसायाच्या ठिकाणचे वातावरण तुम्हाला मोहित करणारे असेल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
एक वेगळेच उत्साही आणि आनंदी वातावरण लागेल बऱ्याच दिवसांनी मनासारख्या घटना घडतील.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कलाकारांना आपली कला प्रदर्शित करण्याची संधी मिळेल दुसऱ्यांना शिकवण्याच्या ही संधी मिळतील.
मीन रास (Pisces Horoscope Today)
विद्यार्थ्यांना स्पर्धेला तोंड द्यावी लागेल नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी तरुणांना आवडता जोडीदार मिळण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :