Malaika Arora Mystery Man Is Harsh Mehta: बॉलिवूडची (Bollywood News) फिटनेस क्वीन आणि स्टाईल आयकॉन मलायका अरोरा (Malaika Arora) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही मलायका तिशीतल्या बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते. तिच्या अदा, तिचा फिटनेस नवख्या अभिनेत्रींना लाजवेल असाच आहे. जसजसं तिचं वय वाढतंय, तसतशी ती आणखी सुंदर आणि ग्लॅमरस दिसतेय. मलायका सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. आताही तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मलायका एका 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसतेय. व्हिडीओ व्हायरल झाला आणि चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली. प्रत्येकजण मलायकासोबत स्पॉट झालेल्या मिस्ट्री मॅनबाबतच चर्चा करताना दिसतोय. तुम्हाला माहितीय का? मलायकासोबत दिसलेला 'मिस्ट्री मॅन' नेमका आहे तरी कोण? 

Continues below advertisement

मलायका अरोरा मुंबईतील एनरिक इग्लेसियसच्या (Enrique Iglesias) कॉन्सर्टमध्ये दिसलेली. त्यावेळी तिनं पांढऱ्या रंगाचा टँक टॉप आणि निळ्या शॉर्ट्समध्ये स्टायलिश अंदाजात एन्जॉय करत होती. पण, त्यावेळी मलायकापेक्षाही तिच्यासोबत असलेल्या 'मिस्ट्री मॅन'वर साऱ्यांच्या नजरा खिळल्या. शोमधले त्या दोघांचे व्हिडीओ क्षणार्धात व्हायरल झाले. कॉन्सर्टमध्ये मलायका व्हिआयपी सेक्शनमध्ये एन्जॉय करत होती. 

पण, खऱ्या चर्चा तेव्हा सुरू झाल्या, जेव्हा तिच्यासोबत 'मिस्ट्री मॅन' दिसला. त्यानंही मलायकासोबत ट्विनिंग केलेलं. पांढरा शर्ट, निळ्या डेनिममध्येच मिस्ट्री मॅन दिसून आला. संपूर्ण कॉन्सर्टमध्ये तो मलायकासोबतच होता, तिच्याशी गप्पा मारत होता, तिच्यासोबत एन्जॉय करत होता. दोघे एकत्रच इव्हेंटमधून बाहेर पडताना दिसले. 

Continues below advertisement

'मिस्ट्री मॅन' कोण माहितीय? 

मीडिया रिपोर्टनुसार, मलायका अरोरासोबत दिसलेला 'मिस्ट्री मॅन' 33 वर्षांचा आहे. हा 'मिस्ट्री मॅन' हिरे व्यापारी असून त्याचं नाव हर्ष मेहता (Harsh Mehta) असं आहे. हर्ष मेहता (Harsh Mehta) मलायकापेक्षा तब्बल 19 वर्षांनी लहान आहे. असं म्हटलं जात आहे की, हर्ष बेल्जियममध्ये डायमंडचा बिझनेस करतो. गेल्या काही महिन्यांपासून मलायका आणि हर्ष एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतायत. अद्याप दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही तरी, सोशल मीडियावर फिरणारे फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चांना उधाण आलं आहे. 

मलायकाचा अर्जून कपूरसोबतचा चॅप्टर संपला?

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) यांचं नातं फार लांबपर्यंत चाललं. पण, गेल्या काही वर्षांत दोघांचे रस्ते वेगळे झाले. मीडिया रिपोर्टनुसार, ब्रेकअपनंतर मलायकानं स्वतःला कामात व्यस्त ठेवलं. आता असंही म्हटलं जातंय की, मलायकाची आणि हर्ष मेहताची (Harsh Mehta) भेट एका हायप्रोफाईल पार्टीत झालेली. ज्यानंतर दोघांमधील मैत्री आणखी  घट्ट झाली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Shiney Ahuja Photo Viral: बॉलिवूडच्या हँडसम हंकला ओळखता? 7 वर्षांच्या तुरुंगवासामुळे करिअरला लागला ब्रेक, सध्या काय करतोय 'हा' अभिनेता?