Prajakta Mali Viral Video: मराठी मालिकाविश्व (Marathi Serial World) आणि सिनेसृष्टीतील मनमोहक चेहरा कोण? असा प्रश्न विचारला तर, सर्वात पहिलं नाव प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हेच असेल. 'सुवासिनी' मालिकेतून डेब्यू करणारी प्राजक्ता माळी ललित प्रभाकरसोबतच्या 'जुळून येती रेशीम गाठी' (Julun Yeti Reshimgathi) मालिकेमुळे घराघरांत पोहोचली. पुढे प्राजक्तानं सिनेसृष्टीतही पदार्पण केलं. मालिका, सिनेमे आणि वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारी प्राजक्ता माळी सध्या अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. तंस पाहायला गेलं तर, अभिनेत्री आणि उद्योजिका असलेली प्राजक्त माळी नेहमीच चर्चेत असते. पण, आता मात्र तिच्या चर्चेत असण्याचं कारण थोडं वेगळं आहे. नेहमीच ग्लॅमरस आणि हटके दिसणारी प्राजक्ता अगदी साध्यासुध्या लूकमध्ये दिसली आणि चाहत्यांची चिंता वाढली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
प्राजक्ता माळी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती तिचे ग्लॅमरस आणि हटके फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या क्लासी आणि लक्ष वेधून घेणाऱ्या लूकची चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चा रंगते. पण, नुकत्याच एका प्रीमियर सोहळ्यातील तिच्या अत्यंत साध्या लूकनं तिनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि आता सोशल मीडियावर तिची जबरदस्त चर्चा रंगली आहे.
प्राजक्ता 'अवतारात' दिसली अन् चाहत्यांची चिंता वाढली...
नुकताच 'बाप तुझ्यापायी' या वेब सीरिजचा खास प्रीमियर सोहळा पार पडला. मुंबईतील या सोहळ्याला अनेक मराठी कलाकार आणि दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावलेली. पण, या प्रीमियर सोहळ्यासाठी नेहमी पारंपारिक साडीमध्ये किंवा खास डिझायनर ड्रेसमध्ये दिसणारी प्राजक्ता माळी मात्र, अत्यंत साध्या अंदाजात दिसली. तिनं नॉर्मल जीन्स, व्हाईट शर्ट वेअर केलेलं आणि त्यासोबत नो-मेकअप लूक कॅरी केलेला. अचानक एका इव्हेंटसाठी प्राजक्ता साध्यासुध्या अंदाजात आल्यामुळे चाहत्यांच्या चिंतेत मात्र भर पडली.
प्राजक्ता माळीचा लूक पाहून फोटोग्राफर्सही थक्क झाले. तेव्हा प्राजक्तानं हसत हसत त्यांना उत्तर दिलं की, "मी आज अवतारात आले आहे!" प्राजक्ताचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं. पण, तिला नेमकं झालं काय? ती अशी साध्यासुध्या अंदाजात का आली? ती ठीक तर आहे ना? अशा अनेक चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :