Shiney Ahuja Photo Viral: 'लाईफ इन ए मेट्रो'मध्ये शिल्पा शेट्टीसोबत (Shilpa Shetty) झळकलेला बॉलिवूड (Bollywood News) अभिनेता तुम्हाला आठवतोय का? तोच 'भुलभूलैया'मध्ये विद्या बालनसोबत आणि त्याहीआधी 'गँगस्टर' सिनेमात कंगना रणौतसोबत दिसलेला. 2000 च्या दशकात कुणास ठावूक कुठून आला, पण अगदी अल्पावधीतच, दिग्गजांच्या पंगतीत जाऊन बसला. आम्ही ज्या अभिनेत्याबाबत बोलत आहोत, त्याचं नाव 'शायनी आहूजा' (Shiney Ahuja). यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना एका प्रकरणात नाव आलं अन् अचानक बॉलिवूड करिअरला (Bollywood Career) पूर्णविराम मिळाला. तेव्हापासून हा अभिनेता कुठेच दिसला नाही. आज तो बॉलिवूडच्या ग्लॅमरपासून दूर एक शांत, एकांत आयुष्य जगतोय. नुकताच या हँडसम हंकचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्याला ओळखणंही कठिण झालं आहे. 

Continues below advertisement

2009 साली शायनीवर एका महिलेने बलात्काराचा आरोप लावला. ती महिला शायनीच्या घरात काम करणारी होती. या आरोपांमुळे शायनीचं करिअर उद्धवस्त झालं. आता शायनी आहुजा नक्की कुठे आहे आणि काय करतो? सध्या सोशल मीडियावर शायनीचा एक फोटो व्हायरल होत आहे. पण, या फोटोमध्ये शायनीला ओळखणं कठिण झालं आहे. शायनीचा फोटो पाहून सारेच थक्क झाले आहेत. 

Continues below advertisement

नवी दिल्लीत जन्म झालेला शायनी आहूजानं फिल्म 'हजारों ख्वाहिशें ऐसी' (2005) मधून बॉलिवूडमध्ये दणक्यात सुरुवात केली. ज्यासाठी त्याला फिल्मफेयर अवॉर्डही मिळालेला. अल्पावधीतच त्याच्या समावेश सर्वात हुशार अभिनेत्यांमध्ये करण्यात आला. जो आपल्या दमदार स्क्रीन प्रेजेन्ससाठी ओळखला जाऊ लागला. 

शायनी आहूजाच्या फिल्म्स (Shiney Ahuja Current Graph)

गँगस्टर (2006), वो लम्हे (2006), लाइफ इन अ... मेट्रो (2007) आणि भूल भुलैया (2007) यांसारख्या हिट फिल्म्समधून त्याचं करियर यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलं. या फिल्म्समध्ये त्याला हिरो बनवण्यात आलं आणि त्याचं खूप कौतुकही करण्यात आलं. 

शायनी आहूजावर लैंगिक शोषणाचे आरोप (Shiny Ahuja Accused Sexual Harassment)

2009 मध्ये सर्वकाही बदललं, जेव्हा शायनी आहुजावर त्याच्या हाऊल हेल्परनं लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप लावले. या प्रकरणानं फिल्म इंडस्ट्रीसह संपूर्ण देश हादरला. हे प्रकरण माध्यमांनी उचलून धरलं, पण काही काळानं पीडितेनं आपलं वक्तव्य मागे घेतलं. पण, तरीसुद्धा अभिनेत्यालाच दोषी ठरवलं गेलं. त्याला 2011 मध्ये सात वर्षांसाठी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणानं त्याच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आणि तो बॉलिवूडपासून दुरावला. त्याच्या करिअरला ब्रेक लागला. 

शायनी आहूजाचा वापसीचा प्रयत्न, पण तरीही तो फ्लॉप 

आपली शिक्षा भोगून परतल्यानंतर शायनीनं फिल्म्समधून वापसी करण्याचा प्रयत्न केला. त्यानं घोस्ट (2012) मध्ये काम केलं, जे बॉक्स ऑफिसवर प्रचंड अयशस्वी ठरलं. नंतर त्यानं 'वेलकम बॅक' (2015) मध्ये एक छोटासा रोल केला. पण, इंडस्ट्री आणि प्रेक्षकांनी जास्त रिअॅक्ट केलं नाही. सर्व प्रयत्नांनंतर शायनी आपल्या जुन्या ओळखीसह बॉलिवूडमध्ये परत आला. पण, 2009 मधल्या त्याच्या भूतकाळानं त्याची पाठ काही सोडली नाही.  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Prajakta Mali Viral Video: प्राजक्ता माळीला झालंय तरी काय? रेड कार्पेटवर अशी उतरली की, फोटोग्राफर्सही कोड्यात पडले, अभिनेत्री म्हणाली...