Stampede at Mata Vaishno Devi Bhawan: जम्मू (Jammu)मधील कटरा (Katra) येथील वैष्णोदेवी मंदिरामध्ये रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत 12 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर नारायणा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी वैष्णो देवी मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. रात्रीच्या सुमारास अचानक गोंधळ झाल्यानं चेंगराचेंगरी झाली. पंतप्रधान मोदी यांनी या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. सरकारकडून दुर्घटनेत मृत पावलेल्या भाविकांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये प्रत्येकी तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत घोषित केली आहे. शिवाय मदतीसाठी हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आला आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी भाविकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बचावकार्य सरु आहे. जखमींना नारायण रुग्णालयात नेण्यात येत असून, एकूण जखमींच्या संख्येबाबत अधिक माहिती स्पष्ट झाली नाही. माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात अचानकपणे झालेल्या या चेंगराचेंगरीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
हेल्पलाईन नंबर जारी
पीएम मोदींकडून शोक व्यक्त
पंतप्रधान मोदी यांनी या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, माता वैष्णो देवी भवनातील चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्यूंमुळं दु:खी आहे. सर्व मृतांना श्रद्धांजली अर्पण करतो. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा,केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांच्याशी चर्चा केली आहे.
माता वैष्णोदेवी येथील दुर्घटनेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मी ताबडतोब कटरा येथे जात आहे. मी प्रशासनाशी सविस्तर चर्चा करण्यार आहे आणि पंतप्रधान मोदी यांना परत रिपोर्ट देणार आहे, असं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे.