Malaika Arora Arbaaz Khan Divorce : अभिनेत्री मलायका आरोरा (Malaika Arora)आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर नेहमी चर्चा होत असते. मलायका आणि अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) यांचा घटस्फोट 2017 मध्ये झाला. त्यानंतर मलायका आणि अर्जुनच्या अफेअरबद्दल चर्चा सुरू झाली. एका मुलाखतीमध्ये मलायकाने तिच्या घटस्फोट घेण्याच्या निर्णयाबाबत सांगितले होते.     


मुलाखतीत मलायका म्हणाली, 'घटस्फोट घेणे हा खूप मोठा निर्णय आहे. मला घटस्फोटानंतर स्वातंत्र्य मिळालं. आयुष्यात स्वत:साठी मी स्टँड घेऊ शकले. '
पुढे मलायकाने सांगितले, 'कोणालाही पुन्हा प्रेमात पडायला आवडेल. सिंगल राहायला कोणालाच आवडत नाही. '






मलायका आणि अभिनेता अरबाज खान यांनी लग्नानंतर 19 वर्षांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. 1998 साली अरबाज आणि मलायकाचे लग्न झाले. त्यानंतर 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. लग्नाआधी दोघांनीही जवळपास 5 वर्षे एकमेकांना डेट केले होते.  त्या दोघांना अरहान नावाचा मुलगा आहे.


Arjun Kapoor and Malaika Arora : अर्जुननं दिली मलायकावरच्या प्रेमाची कबुली; फोटोच्या कॅप्शननं वेधलं लक्ष


Arbaaz Khan-Malaika Arora Divorce : मलायकासोबत घटस्फोटानंतर ट्रोल झाला होता अरबाज; दिले सडेतोड उत्तर


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha