Malaika Arora : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका आरोरा (Malaika Arora) सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. मलायका तिच्या मैत्रिणींसोबतचे तसेच कुटुंबासोबतचे फोटो शेअर करते. मलायकाच्या बहिणीचा म्हणजेच अभिनेत्री अमृता आरोराचा (Amrita Arora) आज (31 जानेवारी) 41 वा वाढदिवस आहे. अमृताच्या वाढदिवसानिमित्त मलायकानं सोशल मीडियावर फोटो शेअर केला. या फोटोमध्ये करिश्मा कपूर (Krisma Kapoor) आणि करिना कपूर (Kareena Kapoor) देखील दिसत आहेत. 


मलायकानं शेअर केलेल्या फोटोमध्ये अमृता केक कट करताना दिसत आहे. मलायकानं शेअर केलेल्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये मलायकानं लिहिले, 'माझ्या लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. ' 






करिनानं देखील अमृतासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून तिला वाढदिवसाचा शुभेच्छा दिल्या आहेत.






अमृतानं 2002 मध्ये 'कितने दूर कितने पास' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटामध्ये अमृतासोबतच अभिनेता फरदीन खानने देखील महत्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई केली नाही,. मात्र चित्रपटामधील अमृताच्या अभिनयानं प्रेक्षकांचे मन जिंकले.  


संबंधित बातम्या


Tu Tevha Tashi : स्वप्नीलचं चाहत्यांना सरप्राईज, जीवलगानंतर आता 'तू तेव्हा तशी' मालिकेत दिसणार


Bigg Boss 15 Winner: बिग बॉस विजेती Tejasswi Prakash वर बक्षिसांचा पाऊस; पाहा काय मिळाले


Divyanka Tripathi : दिव्यांका त्रिपाठीनं सांगितला 'कास्टिंग काउच' चा अनुभव; म्हणाली...


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha