Malaika Arora : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो तसेच डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. अनेक वेळा मलायकाला नेटकरी तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे ट्रोल करतात. नुकताच मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये मलायका व्हाईट कलरचा शर्ट, ब्राऊन कलरचा स्वेटर आणि पिच कलरचे शूज अशा लूकमध्ये दिसत आहे. मलायकाच्या या लूकला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. अनेकांनी या व्हिडीओला कमेंट केली आहे. 

Continues below advertisement

एका नेटकऱ्यानं मलायकाच्या लूकबद्दल कमेंट केली, 'पँट घरीच विसरली दीदी' तर दुसऱ्यानं कमेंटमध्ये लिहिले, 'माझ्या आजोबांकडे देखील असाच स्वेटर आहे.'

ट्रोलर्सबद्दल एका मुलाखतीमध्ये मलायकानं सांगितलं होतं, 'अनेकवेळा महिलेला तिच्या शॉर्ट स्कर्टवरून तसेच नेकलाइनवरून ट्रोल केले जाते. प्रत्येक जण त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळे कपडे घातल असतात. ट्रोल करणारे व्यक्ती वेगळ्या पद्धतीनं विचार करत असतात. पण मी माझ्या आवडीनुसारच कपडे घालणार. मी कम्फर्टेबल असेल तर मी ते कपडे घालणार मी वेडी नाहिये मला माहित आहे कशा प्रकारचे कपडे मला सूट होतात. माझी मर्जी मी कोणतेही कपडे घालेन.' 

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha