Sandeep Pathak on Maharashtra Politics : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना बुधवारी ईडीकडून अटक करण्यात आली. नवाब मलिक यांना तीन मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर आता अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली आहे. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधक भाजप यांनी परस्पर विरोधी आंदोलन केले. महाविकास आघाडी सरकारने भाजप आणि ईडी विरोधात तीव्र निदर्शने केली. तर भाजपने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राज्यातील या राजकीय संघर्षावर मराठी अभिनेता संदीप पाठक यांनी दोन ओळीत आपलं मत व्यक्त केले आहे. 


अभिनेता संदीप पाठक यांनी ट्वीट करत राज्यातील ईडी कारवाईवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “ईडा पिडा टळो” की “ईडी पिडी टळो”??? 🤔 अशा आशयाचे ट्वीट संदीप पाठक यांनी केले आहे. या ट्विटसोबतच त्याने #घडलंयबिघडलंय #ED #maharashtrapolitics असे हॅशटॅग वापरले आहेत. संदीप पाठक यांनी आपल्या ट्विटमधून राज्यातील परिस्थितीवर आपले मत व्यक्त केले आहे. संदीप पाठक यांनी थेट कोणत्याही पक्षावर निशाणा साधला नाही. मात्र, संदीप पाठक याच्या ट्विटमधून बऱ्याच गोष्टी स्पष्ट दिसत आहेत.  






राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाल्याचं दिसून येत आहे. महाविकास आघाडीकडून या प्रकाराचा निषेध केला जात असताना भाजपाकडून ईडीच्या कारवाईचं समर्थन केलं जातेय. भाजप आणि महाविकास आघाडी पक्षाकडून परस्परविरोधी आंदोलने केली जात आहेत. 


 मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live