Mahesh Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टनं (Alia Bhatt) तिच्या अभिनयाने अनेकांची मनं जिंकली.  आलियाचा चाहता वर्ग मोठा आहे. आलिया सध्या तिच्या गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 25 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.  आलियाचे वडील महेश भट्ट (Mahesh Bhatt ) यांनी आलियाच्या अभिनयाबद्दल तसेच तिच्या यशाबद्दल एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. 


महेश भट्ट यांना आलियाबद्दल अभिमान वाटतो
महेश भट्ट यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की,  आलिया आज ज्या स्थानावर पोहोचली आहे, त्यामागे तिची मेहनत आणि समर्पण आहे. आलिया खूप हुशार आहे. या मुलाखतीदरम्यान, महेश भट्ट यांनी आलियाबद्दल एक मजेशिर गोष्ट सांगितली. ते म्हणाले की, आलिया लहान असताना माझ्याकडून 500 रूपये घेण्यासाठी माझ्या पायांना क्रीम लावायची.


कलाकारनां खूप धैर्याची गरज असते.
'आलिया मेहनतीने आणि मन लावून काम करते, कामात स्वत:ला झोकून देते, तीने आज जेवढा पैसे कमावले आहेत, तेवढे पैसे मी गेल्या 50 वर्षांच्या आयुष्यात कमावू शकलो नाही.' असंही महेश भट यांनी सांगितलं. 


पुढे ते म्हणाले, 'प्रेक्षकांनी तिला भरभरून प्रेम दिले आहे. अशा परिस्थितीत कलाकार होण्यासाठी खूप धैर्याची गरज असते. मेहनत करून चित्रपट बनवणाऱ्या या लोकांबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. अनेक अडथळ्यांचा सामना ते करत असतात. संकंटांचा सामना करून ते पुन्हा नव्याने सुरुवात करतात. लहान वयात या क्षेत्रात करिअर करतात त्यांचं मी कौतुक करतो.' 


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha