Maidaan Movie : मागील अनेक दिवसांपासून अजय देवगनच्या (Ajay Devgan) 'मैदान' (Maidaan) या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. या चित्रपटाचा टीझर लॉन्च केल्यानंतर या सिनेमाच्या ट्रेलरची उत्सुकता प्रेक्षकांना होती. तसेच टीझरनंतर चित्रपटाच्या ट्रेलरला देखील प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिलाय. मैदान या चित्रपटात अजय देवगन पुन्हा एकदा एका नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ईदच्या दिवशी म्हणजेच 10 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


'मैदान' या चित्रपटात अजय देवगणने भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा 'मैदान'चा ट्रेलर रिकाम्या फुटबॉल स्टेडियमपासून सुरू होतो आणि अजय देवगण त्याकडे पाहत आहे. त्यानंतर  आम्ही ना सर्वात मोठा देश, ना श्रीमंत,  अर्धे जग आपल्याला ओळखतही नाही. फुटबॉल आपली ओळख निर्माण करू शकतो कारण संपूर्ण जग फुटबॉल खेळते. त्यामुळे भारताने पुढील 10 वर्षांसाठी जागतिक दर्जाचा संघ तयार करण्याचे लक्षात ठेवले पाहिजे, असा अजय देवगनचा डायलॉग आहे. 






अजय देवगनच्या डायलॉगने जिंकली प्रेक्षकांची मनं 


'मैदान'च्या ट्रेलरमध्ये भारत आपल्या खेळाडूंच्या माध्यमातून फुटबॉलच्या मैदानात आपली ओळख कशी लढवतो हे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवर चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिलाय. अजय देवगणसोबतच्या प्रत्येक सीनचे कौतुक होत असले तरी ट्रेलरच्या शेवटी अजय देवगणने बोललेल्या डायलॉगने मन जिंकले आहे.  'सोच एक समझ एक दिल एक, इसलिए मैदान में आज उतरना 11, लेकिन दिखना एक', असा अजयचा डायलॉग आहे. 


कोण होते सय्यद अब्दुल रहीम?


'मैदान'या चित्रपटात प्रियामणी आणि गजराज राव यांच्याही भूमिका आहेत.अमित शर्मा यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. भारतीय फुटबॉलच्या सुवर्णकाळाची कथा चित्रपटात अतिशय बारकाईने दाखवण्यात येणार आहे. सय्यद अब्दुल रहीम यांची यात महत्त्वाची भूमिका होती. 1950 ते 1963 या काळात ते भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक होते. हा चित्रपट 10 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 


ही बातमी वाचा : 


Shaitaan Movie: 'ओपनिंग डे'लाच अजय देवगन आणि आर माधवन बॉक्स ऑफिसवर धम्माल करणार, 'शैतान'च्या अॅडव्हान्स बुकींगची होणार कमाल