Shaitaan Movie Advance Booking : सध्या चर्चेत असलेला शैतान (Shaitaan) हा चित्रपट 8 मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. बॉलीवूडचे दोन दिग्गज कलाकार अजय देवगण (Ajay Devgan) आणि आर माधवन (R Madhavan) हे दोघे या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांना तर आहेच, पण ओपिनिंग डेच्या दिवशीच हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवणार असल्याचं म्हटलं जात आहे. कारण जवळपास 1 लाख तिकिटं ही अॅडव्हान्स बुकिंगमध्येच विकली गेली असल्याचं समोर आलं आहे. 


शैतानच्या समोर सध्या सिनेमागृहात कोणताही चित्रपट नाही. त्यामुळे या चित्रपटाला बराच फायदा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून बॉक्स ऑफिसवर अनेक अपेक्षा आहेत. शैतानच्या ट्रेलरला देखील जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. रिपोर्टनुसार, गुरुवारी सकाळपर्यंत या चित्रपटाची 98,983 तिकिटं विकली गेलीत. त्यामुळे या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकींमध्येच 2.29 कोटींची कमाई केली असल्याची माहिती देण्यात आलीये. 


'शैतान' चित्रपटाचे बजेट


दिग्दर्शक विकास बहलने यापूर्वी 'क्वीन', 'चिल्लर पार्टी' आणि 'सुपर 30' सारखे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. दरम्यान अजय देवगणसाठी देखील हे चित्रपट अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण लॉकडाऊननंतर प्रदर्शित झालेले त्याचे दोन चित्रपट 'थँक गॉड' आणि 'रनवे 34' बॉक्स ऑफिसवर  फार कमाल दाखवू शकले नाहीत.  मात्र, 'शैतान' त्याच्या कथा आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा दिसतो. चांगली गोष्ट म्हणजे या चित्रपटाचे बजेट फक्त 60-65 कोटी रुपये आहे. अशा परिस्थितीत जर हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला तर तो सुपरहिट म्हणता येईल.


'ओपनिंग डे'ला किती होऊ शकते शैतानची कमाई?


अॅडव्हान्स बुकींगचे आकडे पाहता, ओपनिंग डेला,  'शैतान' पहिल्या दिवशी 10-12 कोटींची कमाई सहज करणार असल्याचा अंदाज आहे. दरम्यान पहिल्या वीकेंडनंतर कमाईचा जोर कायम ठेवणं या चित्रपटासाठी महत्त्वाचं आहे. सध्या, 'आर्टिकल 370' आणि 'मिसिंग लेडीज' व्यतिरिक्त, थिएटरमध्ये 'डून 2' हा एकमेव हॉलीवूड चित्रपट आहे, जो चांगली कमाई करत आहे.






ही बातमी वाचा : 


Kajal Agarwal : फोटो काढण्याच्या निमित्ताने धरली अभिनेत्रीची कंबर, चाहत्याच्या गैरवर्तानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल