Sarkaru Vaari Paata : दाक्षिणात्य चित्रपसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) आणि किर्ती सुरेश (Keerthy Suresh) यांचा  सरकारू वारी पाटा (Sarkaru Vaari Paata) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट आता 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. सध्या सोशल मीडियावर महेश बाबूच्या या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. 


पुष्पा द राइजचं रेकॉर्ड तोडणार का?


पुष्पा द राइज या चित्रपटाचं वर्ल्ड वाइड कलेक्शन हे हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर 166.82 कोटी होते. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये या चित्रपटानं 4.03 कोटींची कमाई केली होती. तसेच 12 व्या दिवशी या चित्रपटानं 190.84 कोटी कमाई केली. आता सरकारू वारी पाटा हा चित्रपट लवकरच पुष्पाचं रेकॉर्ड तोडणार आहे, असं म्हटलं जात आहे. 


महेश बाबू आणि किर्ती सुरेश यांच्यासाठी हा चित्रपट खास आहे. महेश बाबूचा काही दिवसांपूर्वी सरिलेरु नीकेवरु  हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटानं 260 कोटींचे वर्ल्ड वाइड कलेक्शन केले होते. आता महेश बाबूचा सरकारू वारी पाटा  हा चित्रपट कोणत्या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडेल, याच्याकडे महेश बाबूच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.






12 मे रोजी हा चित्रपट रिलीज झाला. परशुराम यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. 'सरकारु वारी पाटा' सिनेमात महेश बाबू एका बॅंक मॅनेजरच्या भूमिकेत आहे. चित्रपटातील महेश बाबू आणि कीर्ती सुरेश यांच्या रोमॅंटिक अंदाजाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.


1983 साली 'पोरातम' या चित्रपटातून बाल भूमिकेच्या माध्यमातून महेश बाबूने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर 1999 साली 'राजा कुमारुदु' या चित्रपटातून पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली.


संबंधित बातम्या