Vikram : सध्या दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. तीन जून रोजी कमल हसन (Kamal Hassan)यांचा 'विक्रम' (Vikram)  हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 400.2 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. चित्रपटानं पहिल्या आठवड्यात 135 कोटींची कमाई केली होती. चित्रपटामधील डायलॉग्स आणि कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अनेकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं. नुकतीच प्रसिद्ध अभिनेता  महेश बाबूनं (Mahesh Babu) विक्रम या चित्रपटाच्या टीमचं कौतुक केलं आहे. त्यानं ट्वीट शेअर करुन या चित्रपटाचं कौतुक केले. 


महेश बाबूचे ट्वीट


'विक्रम हा ब्लॉकबस्टर सिनेमा आहे. दिग्दर्शक लोकेश कानगराज यांच्यासोबत या चित्रपटाच्या निर्मितीबाबत चर्चा करायला आवडेल. अभिनेता विजय सेतुपती आणि फहद फासिल  यांनी खूप चांगले काम केले आहे. या चित्रपटाचे म्युझिक देखील चांगले आहे. आणि फायनली कमल हसन... तुमच्या अभिनयाबद्दल मी बोलू शकत नाही कारण मी एवढा मोठा नाही. मी एवढंच बोलू शकतो की, तुमचा चाहता असल्याचा मला अभिमान वाटत आहे.', असं महेश बाबूनं ट्वीटमध्ये लिहिलं. 






विक्रम हा चित्रपट डिज्नी प्लस हॉस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. आठ जुलै रोजी हा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षक पाहू शकणार आहेत. चित्रपटामध्ये कमल हसन यांच्यासोबतच विजय सेतुपती, शिवानी नारायण, फहाद फासिल आणि सुर्या या कलाकारांनी देखील या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. ‘विक्रम’ हा चित्रपट जगभरात 3200 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. ‘विक्रम’ हा लोकेश कनागराज दिग्दर्शित अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे.  अभिनेता सुर्याचा या चित्रपटात एक कॅमिओ देखील आहे, यात तो ‘रोलेक्स’ची भूमिका करताना दिसला होता. 


महेश बाबूच्या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती


'सरकारु वारी पाटा' हा महेश बाबूचा चित्रपट 12 मे रोजी हा चित्रपट रिलीज झाला. परशुराम यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. 'सरकारु वारी पाटा' सिनेमात महेश बाबू एका बॅंक मॅनेजरच्या भूमिकेत आहे. चित्रपटातील महेश बाबू आणि कीर्ती सुरेश यांच्या रोमॅंटिक अंदाजाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.


हेही वाचा: