Vikram : सध्या दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी कमल हसनचा (Kamal Hassan)  'विक्रम' (Vikram)  हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 390 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. चित्रपटानं पहिल्या आठवड्यात 135 कोटींची कमाई केली. हा चित्रपट तीन जून रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटामधील डायलॉग्स आणि कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर हा चित्रपट आता ओटीटीवर रिलीज होणार आहे. 


विक्रम हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर जवळपास एक महिन्याच्या आत हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होतोय. रिपोर्टनुसार, हा चित्रपट डिज्नी प्लस हॉस्टार (Ott Platform Disney Plus Hotstar) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. आठ जुलै रोजी हा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षक पाहू शकणार आहेत. डिज्नी प्लस हॉटस्टारच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये अभिनेता कमल हसन दिसत आहे.  चित्रपटामध्ये कमल हसन यांच्यासोबतच विजय सेतुपती, शिवानी नारायण, फहाद फासिल आणि सुर्या या कलाकारांनी देखील या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे.






‘विक्रम’ हा चित्रपट जगभरात 3200 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. ‘विक्रम’ हा लोकेश कनागराज दिग्दर्शित अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात विजय सेतुपती, फहाद फासिल, कमल हासन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अभिनेता सुर्याचा या चित्रपटात एक कॅमिओ देखील आहे, यात तो ‘रोलेक्स’ची भूमिका करताना दिसला होता. रिपोर्ट्सनुसार, 150 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 11 दिवसांत भारतातील सर्व भारतीय भाषांमध्ये 220.75 कोटींची कमाई केली. विक्रम चित्रपटामधील डायलॉग्स आणि गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. 


हेही वाचा: