Inaaya Kemmu : अभिनेत्री सोहा अली खान (Soha Ali Khan) आणि अभिनेता कुणाल खेमू (Kunal Kemmu) सोशल मीडियावर त्यांच्या चिमुकल्या इनायाचे (Inaaya Kemmu) फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. इनायाचा क्यूटनेस चाहत्यांनाही खूप आवडतो. नुकत्याच पोस्ट केल्या गेलेल्या व्हिडीओमध्ये इनाया तिच्या आई-वडिलांसोबत महाशिवरात्रीची (Mahashivratri 2022) पूजा करताना दिसली आहे. या व्हिडीओत इनाया महादेवावर जलाभिषेक करत आहे.


या पूजेवेळी कुणाल खेमू शंखनाद करताना दिसत आहे आणि सोहा त्याच्याकडे प्रेमाने बघत हसत आहे. सोहाची ही क्युट प्रतिक्रिया चाहत्यांना खूप आवडली. सोहा अली खान अनेकदा फॅमिली फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. इनायाचे क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात.


पाहा व्हिडीओ :



इनायाच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी खूप कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले की, ‘सोहा तू तुझ्या मुलीला चांगले संस्कार देत आहेस.’ आणखी एका चाहत्याने लिहिले, ‘इनाया, तू मन जिंकले आहेस.’


यापूर्वी सोहा अली खानने लेक इनाया गायत्री मंत्र गातानाचा व्हिडीओ शेअर केला होता, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये इनाया गायत्री मंत्र म्हणताना दिसला होता. कुणाल खेमूने देखील हा व्हिडीओ शेअर केला होता. 



कुणाल खेमू आणि सोहा अली खान यांची मुलगी इनाया हिने एकही शब्द न विसरता संपूर्ण गायत्री मंत्र तोंडपाठ केला.


सोहा अली खान म्हणते की, तिच्या दोन वर्षांच्या मुलीला सर्व सण साजरा करायला आवडतात. ती सर्व सण साजरे करते आणि इनायाला त्यांचे महत्त्व सांगत राहते. सोहा आणि तिचा पती कुणाल खेमू त्यांच्या सोशल मीडिया पेजवर त्यांच्या मुलीचे फोटो पोस्ट करत असतात.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha