Maharashtra Sahir : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील बिनीचे शिलेदार, स्वातंत्र्यसेनानी कृष्णराव साबळे अर्थात शाहीर साबळे (Shahir Krishnarao Sable) यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात आजपासून (3 सप्टेंबर 2022) झाली आहे. या जन्मशताब्दी वर्षात शाहीर साबळे यांच्या जीवनकार्याचा वेध 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Sahir) या मोठ्या पडद्यावर येणाऱ्या चित्रपटातून घेतला जाणार आहे. शाहीर साबळे यांचे नातू आणि प्रख्यात दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. मात्र, आजच्या या खास दिवसाचं औचित्य साधत केदार शिंदे यांनी या सुवर्ण कथेतलं आणखी एक पान उलगडलं आहे.


‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Sahir) या चित्रपटातून शाहीर साबळे यांची पणती अर्थात केदार शिंदे यांची लेक सना केदार शिंदे (Sana Kedar Shinde) मनोरंजन विश्वात पदार्पण करत आहे. या चित्रपटात सना आपल्या पणजीची म्हणजेच ‘सौ. भानुमती कृष्णराव साबळे’ यांची भूमिका साकारणार आहे. नुकतीचे तिचे या लूकमधील पोस्टर केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. ‘आणि भानुमती यांच्या भूमिकेत पदार्पण करीत आहे त्यांची पणती 'सना केदार शिंदे'. पणजीच्या भूमिकेत पणती...’, असे कॅप्शन लिहित त्यांनी हे पोस्टर शेअर केले आहे.


पाहा पोस्टर:



‘आज 3 सप्टेंबर, शाहीर साबळेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पहिल्या दिवशी सादर करीत आहोत शाहीरांच्या आयुष्यातलं गोड गाणं....सौ. भानुमती कृष्णराव साबळे. आणि भानुमती यांच्या भूमिकेत पदार्पण करीत आहे त्यांची पणती 'सना केदार शिंदे'. पणजीच्या भूमिकेत पणती. शाहीरांचा हा झंझावाती जीवनपट 'महाराष्ट्र शाहीर' सादर करताना केदार शिंदे प्रोडक्शन सोबत आता आहे मराठी चित्रपट क्षेत्रातील महत्वाचं नाव 'एव्हरेस्ट एंटरटेनमेंट!!' पुढच्या वर्षी 28 एप्रिल रोजी पुन्हा गर्जणार महाराष्ट्राच्या थिएटर्समध्ये अजय-अतुलचे सुमधुर संगीत!! महाराष्ट्र शाहीर, 28 एप्रिल 2023 जय महाराष्ट्र!’, अशी खास पोस्ट देखील त्यांनी लिहिली आहे.  


शाहीर साबळे यांच्या जीवनकार्याचा वेध घेणारा चित्रपट!


आता शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या जीवनकार्याचा वेध 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटातून घेतला जाणार आहे. अनेक नाटकं, टीव्ही मालिका केलेल्या ज्येष्ठ लेखिका आणि दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांनी 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटाचे लेखन केले आहेत. तर, शाहीर सावळे यांचे नातू आणि दिग्दर्शक केदार शिंदे हा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. रंगभूमी, टीव्ही मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये केदार शिंदे यांनी दमदार काम केले आहे. अभिनेता अंकुश चौधरी या चित्रपटात शाहीर साबळेंची भूमिका साकारणार आहे. 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट 28 एप्रिल 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


संबंधित बातम्या


Ankush Choudhary : केदार शिंदेंनी शेअर केला अकुंश चौधरीचा शाहीर साबळेंची वेशभूषा साकारतानाचा व्हिडीओ


Kedar Shinde : शाहीर साबळेंनी सिनेमातील गाणी का गायली नाहीत? केदार शिंदेंनी शेअर केली पोस्ट