1 Ott : महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या हस्ते '1 ओटीटी' या नवीन ओटीटीच्या लोगोचे अनावरण 1 डिसेंबर  2021 रोजी राज भवन येथे करण्यात आले. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) आणि उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांचा संयुक्त प्रकल्प असलेले '1 ओटीटी' (ओव्हर द टोप) हे व्यासपीठ हे सर्व भारतीय भाषांमधील कार्यक्रमांसाठी तयार झाले. हिंदीबरोबरच मराठी, बंगाली आणि इतर भारतीय भाषांमधील कार्यक्रम सादर करत हे व्यासपीठ खऱ्या अर्थाने ‘अपने भारत का अपना मोबाइल टीव्ही’ ठरणार आहे.  


भगतसिंह कोश्यारी '1 ओटीटी' च्या लोगोचे आनावरण केल्यानंतर सांगितले , 'श्री स्वप्नील जोशीजी, श्री नरेंद्र फिरोदियाजी आणि त्यांच्या  टीमचे  मी मनापासून अभिनंदन करतो. भारतीय भाषांमधील मनोरंजनासाठी त्यांनी हे अनोखे असे व्यासपीठ दाखल केले आहे. त्यांच्या या प्रयत्नात त्यांना यश मिळो, अशा शुभेच्छा मी त्यांना देतो.'


जोशी आणि फिरोदिया यांच्याबरोबर विनायक सातपुते, वेंकटेश श्रीनिवासन, राजीव जानी, सतीश उतेकर, चेतन मणियार आणि संदीप घुगे त्यांच्या टीममधील इतर सदस्य या  लोगो अनावरण सोहळ्याला उपस्थित होते. 






स्वप्नील जोशीने सांगितले, 'गेली दोन वर्षे मी ओटीटी सुरु करण्याचे ठरवत होतो. एक कलाकार म्हणून काहीतरी वेगळे करणे आणि लोकांना काहीतरी वेगळे देणे, हा त्यामागील हेतू होता. दरम्यानच्या काळात मी जेव्हा फिरोदियाजींशी बोललो. गेली कित्येक वर्षे आम्हा दोघांचे अगदी सलोख्याचे संबंध आहेत. चर्चेनंतर आम्ही दोघांनी एकत्र येवून ही योजना मोठ्या प्रमाणावर राबविण्याचे ठरवले.'