National Pollution Control Day 2021: आज देशभरात राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस (National Pollution Control Day) साजरा केला जात आहे.  2-3 डिसेंबर रोजी  भोपाळ गॅस दुर्घटनेत प्राण गमावलेल्या लोकांच्या स्मरणार्थ दरवर्षी 2 डिसेंबर रोजी भारतात राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस साजरा केला जातो. रिपोर्टनुसार, भोपाळ गॅस दुर्घटनेत अनेक लोकांचा मृत्य झाला होता.  


हा दिवस साजरा करण्याचा उद्देश
लोकांना प्रदूषण रोखण्यास मदत करणाऱ्या कायद्यांची जाणीव करून देणे, औद्योगिक आपत्तींचे व्यवस्थापन आणि नियंत्रण याबाबत जागरूकता पसरवणे आणि औद्योगिक प्रक्रिया आणि मानवी निष्काळजीपणामुळे होणारे प्रदूषण रोखणे हे राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस साजरा करण्याचे उद्देश आहेत







काय घडले होतो भोपाळमध्ये ? 
1984 मध्ये, 2-3 डिसेंबरच्या रात्री युनियन कार्बाइड कारखान्यात मिथाइल आयसो सायनाइड (MIC)ची गळती झाली होती. हा विषारी वायू हवेत मिसळल्याने तो शहरात दूरवर पसरला होता. या गॅस गळतीमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला.  


प्रदूषणाचा आरोग्यावर परिणाम 


देशातच नाही तर जगभरात प्रदुषणाचे प्रमाण वाढत आहे. प्रदुषणाचा आरोग्यावर वाईट परिणाम होते. हवेतील प्रदूषणाचा  हृदय, मेंदू आणि फुफ्फुसावर गंभीर परिणाम होतो. तसेच  कॅन्सरसारख्या आजारांनाही प्रदुषण कारणीभूत ठरत आहेत. एका रिपोर्टनुसार, प्रदूषणाबाबतच्या  WHO च्या  नियमांचे काटेकोरपणे पालन केले तर लोकांचे आयुष्य अनेक वर्षांनी वाढू शकते.





इतर महत्त्वाच्या बातम्या:


Petrol Diesel Price Excise Duty: पेट्रोल- डिझेलवरील उत्पादन शुल्कामुळं सरकारच्या उत्पन्नात दुप्पट वाढ


LPG Cylinder Expiry Date : स्वयंपाक घरातील गॅस सिलेंडरला एक्सपायरी डेट असते? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी


Cyclone Jovad : अस्मानी संकट! राज्याला 'जोवाड' चक्रिवादळाचा धोका; अवकाळीमुळं पिकांचंही मोठं नुकसान