Madhuri Dixit Sridevi Cat Fight: ऐंशी, नव्वदच्या दशकात बॉलिवूडमध्ये (Bollywood News) अनेक सुपरस्टार अभिनेत्री होत्या. त्यापैकी दोन आघाडीची नावं म्हणजे, माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि श्रीदेवी (Sridevi). त्या काळतल्या या दोन्ही अभिनेत्री म्हणजे, कित्येकांच्या गळ्यातील ताईत. बॉलिवूड गॉसिप्स ही संकल्पना आपल्या सर्वांना माहीत आहेच. असेच गॉसिप्स त्या काळात माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी यांच्याबाबत सुरू होते. हे गॉसिप्स म्हणजे, माधुरी आणि श्रीदेवी यांच्यातली कॅट फाईट. त्या काळात अभिनेत्रींमधलं शीतयुद्ध फार चर्चेचा विषय होता आणि त्यासाठी 'कॅट फाईट' हा शब्द प्रचलित होता. अशीच 'कॅट फाईट' त्या काळात माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी यांच्यात सुरू होती, असं म्हटलं जातं. अशातच कित्येक वर्षांपासून सुरू असणाऱ्या चर्चांवर आता माधुरी दीक्षितनं मौन सोडलं आहे. तसेच, सर्व अफवांना पूर्णविराम देऊन दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली आहेत.
माधुरी दीक्षित काय म्हणाली?
माधुरी दीक्षित एका मुलाखतीत बोलताना म्हणाल्या की, "आमच्यात असं काहीच घडलं नव्हतं की, त्यामुळे आम्ही एकमेकांचा अनादर करण्याचा काही प्रश्नच नव्हता... श्रीदेवी या त्या व्यक्तींपैकी एक होत्या, ज्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत कठोर परिश्रम केलेत... आणि मीसुद्धा अगदी तशीच आहे... आम्हा दोघींनाही ही गोष्ट माहीत होती... "
'कलंक' फिल्ममध्ये माधुरी दीक्षितनं घेतलीय श्रीदेवींची जागा
श्रीदेवी यांच्या निधनानंतर माधुरी दीक्षितची धर्मा प्रोडक्शन्सचा रखडलेला सिनेमा 'कलंक'मध्ये वर्णी लागलेली. माधुरीनं 'कलंक'मध्ये महत्त्वाची भूमिका निभावली असून तिनं साकारलेल्या भूमिकेचं कौतुकही झालेलं. सर्वात आधी करण जोहरचा सिनेमा 'कलंक'साठी श्रीदेवी यांना साईन करण्यात आलेलं. पण, 2018 मध्ये श्रीदेवी यांचं अपघाती निधन झालं आणि त्यानंतर 'कलंक'मध्ये कोण भूमिका साकरणार? अशा चर्चांना उधाण आलेलं. त्यानंतर या सिनेमात श्रीदेवींनंतर माधुरी दीक्षितची वर्णी लागलेली.
माधुरी दीक्षितच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, सध्या धक धक गर्ल आपली नुकतीच प्रदर्शित झालेली वेब सीरिज 'मिसेज देशपांडे'मुळे चर्चेत आहे. या सिनेमात तिनं एका महिला कैद्याची भूमिका साकरली आहे. एका हत्येच्या प्रकरणात माधुरी पोलिसांची मदत करते. या सीरिजला प्रेक्षकांकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतोय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :