Urmila Matondkar Quit Acting: तब्बल पाच वर्षांहून अधिक काळ लोटलाय, पण 'रंगिला गर्ल' उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) कोणत्याही फिल्ममध्य दिसलेली नाही. अशातच सध्या चर्चा रंगलीय ती, उर्मिलानं अभिनय आणि बॉलिवूडला (Bollywood News) कायमचा अलविदा म्हटल्याची. कित्येक काळ मोठ्या पडद्यावर न दिसूनही उर्मिलाची एक झलक पाहण्यासाठी आसुसलेले चाहते, अजूनही तिच्या कमबॅकच्या प्रतिक्षेत आहेत. पण, या चर्चांमुळे त्यांचा पुरता हिरमोड झालाय. अशातच आता उर्मिलानं या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे कुठेतरी चाहत्यांच्या जीवात जीव आला आहे. बॉलिवूड किंवा अभिनय सोडल्याच्या चर्चांना उर्मिला मातोंडकरनं पूर्णविराम लावला आहे. तसेच, तिनं सांगितलं की, तिनं अजूनही बॉलिवूड किंवा अभिनय सोडलेला नाही... इतके दिवस ती तिच्या टॅलेंटला न्याय देणाऱ्या भूमिकांचा विचार करत होती, असंही तिनं सांगितलंय.
बॉलिवूडला अलविदा म्हटल्याच्या चर्चांवर काय म्हणाली उर्मिला?
उर्मिला मातोंडकरनं सांगितलं की, आता तिला पुन्हा बॉलिवूडमधून उत्तम आणि रोमांचक ऑफर्स मिळू लागल्या आहेत. ती लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर डेब्यू करणार आहे. उर्मिलानं सांगितलं की, "आता पुन्हा एकदा सेटवर परतण्याची आणि धमाकेदार वापसी करण्याची वेळ आलीय..."
हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाली की, "मी माझ्या कामाच्या बाबतीत नेहमीच निवडक राहिलेय. जर कोणाला वाटलं असेल की, मी आता चित्रपट करणार नाही, तर मी कोणालाही दोष देऊ शकत नाही. मात्र, तसं कधीच नव्हतं... मी आता पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर परतण्यास पूर्णपणे तयार आहे... आता सेटवर परतण्याची वेळ आलीय... मला अशा भूमिका करायच्या आहेत, ज्या मी यापूर्वी कधीही केलेल्या नाहीत..."
OTT वर झळकणार उर्मिला मातोंडकर
उर्मिला मातोंडकरनं स्पष्ट केलंय की, ती ओटीटी प्लॅटफॉर्मबाबत खूप उत्सुक आहे. कारण ते नवं पात्रं आणि शैली एक्सप्लोर करण्याची संधी देतात. उर्मिला म्हणाली की, ओटीटीनं कलाकारांसाठी एक नवं जग उघडलं आहे. असे इमोशन्स आणि पात्रं आहेत, ज्यांचा यापूर्वी कधीही शोध घेतला गेला नाही..." पुढे बोलताना उर्मिलानं असंही सांगितलंय की, तिनं एका ओटीटी शोचं शूटिंग पूर्ण केलं आहे, जो पुढच्या वर्षी रिलीज होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :