Hasan Mushrif on Sanjay Mandlik: शिवसेना नेते आणि माजी खासदार संजय मंडलिक यांनी हिटलर अशी संभावना केल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मी हिटलर नसून मी सेवक आहे. गेली 21 वर्षे मंत्री असूनही कधी अहंकार दाखवला नाही आणि इतकी मस्ती कधी दाखवली नाही, अशा शब्दात हसन मुश्रीफ यांनी संजय मंडलिक यांच्यावर हल्लाबोल केला. मी आणि समरजित एकत्र आल्यानेच आपल्या राजकारणाचं काय होईल या भीतीनेच अशी भाषा येत असावी, असा हल्लाबोलही मुश्रीफ यांनी केला. 

Continues below advertisement

तशी शिकवण आमच्या वडीलधाऱ्यांनी दिलेली नाही

दरम्यान, वीरेंद्र मंडलिक यांच्या गोकुळमध्ये झालेल्या पराभवावर देखील मतदान मोजण्याचे हसन मुश्रीफ यांनी आव्हान दिलं. जसे तुम्ही प्रत्येक निवडणुकीत करता तशी शिकवण आमच्या वडीलधाऱ्यांनी दिलेली नाही. राजकारणात प्रामाणिक आणि विश्वासार्हतेचं दुसरं नाव म्हणजे हसन मुश्रीफ असं म्हणत संजय मंडलिक यांना डिवचले आहे.

आमचे वडील ना खासदार ना आमदार होते

ते म्हणाले की, मी हिटलर नाही लोकांचा सेवेकरी आहे. राजकारणात समाजकारणात असताना आम्हाला कधी मस्ती आली नाही, आमच्या मागे बापजाद्यांची पुण्याई नाही. आमचे वडील ना खासदार ना आमदार होते. मी जनतेच्या विश्वासावर आणि कार्यकर्त्याच्या श्रमावर मोठा झालेला आहे आणि हे मी कधीच विसरत नाही.  मी 21 वर्षे मंत्री आहे मात्र कधीही अहंभाव दाखवला नाही.  माझी आणि समरजित घाटगे यांची युती त्यांना आवडलेली नाही रुचलेली नाही. भविष्यात आपल्या राजकारणाचे काय होईल याची भीती त्यांना वाटत असेल. विधानसभा निवडणुकीदरम्यान मी म्हणालो होतो गोकुळची मतपेटी आपण आज देखील खोलूया. त्या ठिकाणी कळेल कुणी कुणाला किती मते दिली आहेत. जसे ते निवडणुकीमध्ये अनेकवेळा करतात तशी शिकवण आमच्या वडीलधाऱ्यांनी दिली नाही. राजकारणात प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हता याचे दुसरे नाव हसन मुश्रीफ असल्याचे ते म्हणाले. 

Continues below advertisement

कागल नगरपालिकेत एकहाती सत्ता

दुसरीकडे, कागल नगरपालिका निवडणुकीमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजिसिंह घाटगे यांनी एकहाती सत्ता मिळवली. कागल नगरपालिकेमध्ये शिवसेना शिंदे गटाचा दारुण पराभव करत कागल नगरपरिषदेमधील 23 पैकी 23 जागा जिंकत शिंदे गटाला व्हाईट वॉश दिला. नगराध्यक्षपदी सविता प्रताप माने विजयी झाल्या. त्यामुळे एक प्रकारे कागलच्या दोन्ही नेत्यांच्या आघाडीवर मतदारांनी शिक्कामोर्तब केल्याची चर्चा आहे. मात्र, मुरगुड नगरपालिकेमध्ये दोघांच्या आघाडीला मोठा झटका बसला. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाने यश मिळवताना सत्ता खेचली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या