LSD 2:  नुकतचं 'लव सेक्स धोका 2' (LSD) या चित्रपटाचे पहिले पोस्टर समोर आले आहे.  हा चित्रपट 2010 मध्ये आलेल्या  एलएसडीचा  सिक्वेल आहे. त्यातच प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून LSD 2 ची वाट पाहत आहेत. याचदरम्यान या चित्रपटासंदर्भात एक रंजक माहिती समोर आहे.  चित्रपट निर्माते दिबाकर बॅनर्जी (Dibakar Banerjee) यांनी चित्रपटातील विविध पात्रांसाठी एक, दोन नव्हे, शंभर नव्हे तर 6 हजारांहून अधिक कलाकारांची ऑडिशन घेतली.


 चित्रपट निर्माते दिबाकर बॅनर्जी यांनी या चित्रपटातील प्रत्येक पात्र निवडण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. व्यक्तिरेखा कथेत बसेल याची त्यांनी विशेष काळजी घेतली. माहितीनुसार, दिबाकर बॅनर्जी यांनी भूमिकांसाठी सुमारे 6,000 अभिनेत्यांच्या ऑडिशन घेतल्या. ऑडिशन घेतानाच त्याची कोणत्या पात्रासाठी निवड होतेय याकडे त्यांनी विशेष लक्ष दिलं. तसेच त्यांनी यावर बरचं संशोधन देखील केलं होतं. 


भूमिकेसाठी हवे होते नैसर्गिक चेहरे


तसेच भूमिकेसाठी दिबाकर यांनी एकता कपूरसह देशभरातील यूट्यूबर्सचे बरेच फोटो आणि व्हिडिओ काही दिवस जवळपास 10 ते 12 तास पाहिले.या चित्रपटातील भूमिकांसाठी त्याला नैसर्गिक चेहरे हवे होते. जेणेकरून तो प्रेक्षकांशी सहज जोडले जाऊ शकतली. हा चित्रपट सामान्य लोकांबद्दल भाष्य करणारा आहे, ज्यांनी अल्पावधीत त्यांचं प्रभावशाली व्यक्तिमत्त्व निर्माण केलं. या प्रत्येक पात्राने आणि  कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण करावे अशी दिबाकर यांची इच्छा होती, अशी देखील माहिती देण्यात आलीये.  


अभिनेत्रीने सोडला चित्रपट


बालाजी मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली बनत असलेल्या 'एलएसडी 2' या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी केली आहे. या चित्रपटासाठी सुरुवातीला  निर्मात्यांनी मुख्य भूमिकेसाठी अभिनेत्री निमृत कौर अहलुवालियाला प्रथम कास्ट केले होते. पण आता या अभिनेत्रीने हा चित्रपट सोडला असल्याची माहिती समोर आली आहे.जास्त इंटिमेट सीन्समुळे अभिनेत्रीने चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे.  


'LSD 2' चे पोस्टर रिलीज


चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले होते. 2010 च्या स्लीपर हिट 'LSD' चा सिक्वेल असलेला हा चित्रपट 'खोसला का घोसला' आणि 'ओये लकी लकी ओये' नंतर दिबाकर यांचा तिसरा चित्रपट आहे. 'LSD 2' ची निर्मिती एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी केली आहे. हा चित्रपट 19 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.


ही बातमी वाचा : 


Laapataa Ladies Box Collection Worldwide: 'लापता लेडीज'ची अवघ्या तीन दिवसांत रेकॉर्डब्रेक कमाई, भारतातही बॉक्स ऑफीसवर जमवला बक्कळ गल्ला