Low Budget Malayalam Film Of 2024: आज आम्ही तुम्हाला 2024 च्या एका उत्तम चित्रपटाविषयी सांगणार आहोत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या चित्रपटात ना कोणती हिरोईन आहे, ना कुठलाच ॲक्शन सीन, तरीसुद्धा या चित्रपटानं प्रेक्षकांवर आपली छाप पाडली.फक्त आणि फक्त भक्कम कथेच्या जोरावर हा चित्रपट सर्वकालीन ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर त्याच्या खर्चापेक्षा 20 पट अधिक कमाई करून इतिहास रचला.
पूर्वी चित्रपटांचा फॉर्म्युला ठरलेला होता. कथेत एक हिरोईन आणि हिरो असेल आणि नंतर व्हिलनची एन्ट्री होणार. त्यानंतर चित्रपटात खूप अॅक्शन सीन्स असतील. पण आता हळूहळू चित्र बदलताना दिसत आहे. हा ठरलेला फॉर्म्युला डावलून आता नवनवे प्रयोग होताना दिसत आहेत. हे प्रयोग फक्त तेवढ्यापुरतेच मर्यादित राहत नसून सर्वांच्या मनात आपली छाप सोडत आहेत. 2024 साली प्रदर्शित झालेल्या अशाच एका चित्रपटानं लोकांची मनं जिंकली आहेत. 'मंजुम्मेल बॉईज' (Manjummel Boys) असं या चित्रपटाचं नाव आहे.
'मंजुम्मेल बॉईज' हा 2024 सालातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. यात ना कोणी हिरोईन आहे ना कोणी हिरो. चित्रपटात ॲक्शन तर अजिबात नाही. असं असूनही हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला. बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त कमाई झाली.
सुपरडुपर चित्रपटाची कहाणी काय?
हा चित्रपट मुळात मल्याळम भाषेत बनवला आहे. त्याची कथा 11 मित्रांभोवती फिरते. 'मंजुम्मेल बॉईज'मध्ये केरळच्या मंजुम्मेल टाऊनमधील 11 तरुणांनी सहलीला जाण्याचा विचार केल्याचं दाखवण्यात आलंय. गुणा लेणी या नावानं प्रसिद्ध असलेले तामिळनाडूचे चित्तथरारक हिल स्टेशन कोडाईकनाल इथे सगळे पोहोचतात.
गुना केव्ह अनेक धोकादायक ठिकाणांनी भरलेली आहे, जिथे लोकांना जाण्यास मनाई आहे. दरम्यान, सर्व मित्र हे सुंदर दृश्य पाहण्यासाठी आणखी खाली जातात आणि तिथे मोठी दुर्घटना घडते. त्यांच्यातलाच एक मित्र 120 फूट खोल खड्ड्यात पडतो आणि सर्वांच्या पायाखालची जमीन हादरते. यानंतर सर्व मित्र एकत्र येऊन त्याला वाचवतात.
'मंजुम्मल बॉईज'च्या निर्मितीवर निर्मात्यांनी कोणताही मोठा खर्च केलेला नाही. ट्रेड वेबसाइट Sacknilk च्या रिपोर्टनुसार, फक्त आणि फक्त 20 कोटी रुपये खर्च करुन हा चित्रपट पूर्ण झाला. यानंतर चित्रपटगृहांपासून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं खळबळ उडवून दिली.
'मंजुम्मेल बॉईज'नं देशभरात 141.61 कोटींची कमाई केली होती. तसेच, चित्रपटानं जगभरात 240.05 कोटी रुपये कमवून इतिहास रचला होता. अशा प्रकारे 'मंजुम्मेल बॉईज'नं खर्चाच्या 12 पट कमाई करून इतिहास रचला होता. 2024 च्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत त्याचा समावेश आहे.
तुम्ही 'मंजुम्मेल बॉईज' हा चित्रपट अजून पाहिला नसेल, तर तुम्ही घरबसल्या याचा आनंद घेऊ शकता. सध्या हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर हिंदी भाषेत उपलब्ध आहे. 'मंजुम्मेल बॉईज' चं दिग्दर्शन चिदंबरम यांनी केलं आहे. चित्रपटाला IMDb वर 10 पैकी 8.2 रेटिंग मिळालं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :