Lock Upp Show : छोट्या पडद्यावरील   ‘लॉक अप’चा (Lock Upp) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या शोमधील स्पर्धक एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्याचे किस्से प्रेक्षकांना सांगतात. लॉकअप शोचे सूत्रसंचालन अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut)  केले . नुकताच या कार्यक्रामाचा ग्रँड फिनाले पार पडला. कॉमेडियन मुनव्वर फारूकी (Munawar Faruqui) हा लॉक अप कार्यक्रमाचा विजेता ठरला. 70 दिवस मुनव्वर हा लॉक अप कार्यक्रमामध्ये होता. या कार्यक्रमाचा विजेता ठरलेल्या मुनव्वरनं त्याची प्रतिक्रिया दिली आहे. 


लॉक अप शो जिंकल्यानंतर मुन्नवरनं एका व्हिडीओमधून प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, '10 किंवा 20 सेकंदांच्या कामावरून तुम्हाला जज केले जाऊ शकतो. पण जेव्हा 24 तासतुमच्यावर कॅमेरा असतो आणि  प्रेक्षक पाहात असता, तेव्हा तुम्ही खरोखर काय आहात, ते सर्वांपर्यंत पोहोचते. कदाचित ही संधी माझ्या नशिबात लिहिली असावी. मी सर्वांचे आभार मानतो.' 


कंगनाबाबत केलं वक्तव्य 
एका मुलाखतीमध्ये मुनव्वरला कंगनाबाबत एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी मुनव्वर म्हणाला, 'कंगनाने या शोमध्ये अतिशय प्रोफेशनली काम केले आहे आणि तिच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी शोच्या निर्मात्यांचे आभारी आहे.'


मुनव्वरनं मुलाखतीत पुढे सांगितले की, 'माझ्या कामामुळे कोणी दुखावले जाणार नाही, असा विचार मी करतो. मला फक्त माझ्या कामाने लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणायचे आहे. शो जिंकल्यानंतर मी एक मोठी गोष्ट गमावणार आहे आणि ती म्हणजे त्याचे प्रेक्षकांसोबत असलेला कनेक्ट. कारण शोमुळे मी 24 तास त्यांना दिसत होते. ते मी आता गमावले आहे.' 


हेही वाचा :