Vikram : सध्या दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी कमल हसनचा (Kamal Hassan)  'विक्रम' (Vikram)  हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 390.50 कोटींची कमाई केली. हा चित्रपट लवकरच  400 कोटींचा टप्पा पार करणार आहे, असं म्हटलं जात आहे. विक्रम या चित्रपटचं नाव जगभरातील बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 तमिळ चित्रपटांच्या यादीत सामील झालं आहे. जाणून घेऊयात टॉप-10 चित्रपटांची नावे....


सर्वाधिक कमाई  करणारे टॉप -10 तमिळ चित्रपट आणि त्यांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन:
1. 2.0 - रु. 664.70 कोटी 
2. विक्रम- 390.50 कोटी (20 दिन)
3. बिगिल- 298.40 कोटी
4. अँथिरन- 288 कोटी
5. कबाली-285.20 कोटी
6. सरकार- 257.80 कोटी
7. मास्टर- 256.10 कोटी
8. मेर्सल- 250.40 कोटी
9. बीस्ट- 236.90 कोटी
10. मैं- 235.50 कोटी


पेटा आणि दरबार या चित्रपटांनी देखील बॉक्स ऑफिसवर 200 कोटींपेक्षा जास्त कमाई केली पण हे चित्रपट टॉप-10 चित्रफटांच्या यादीत स्थान मिळवू शकले नाहीत.  पेटा या चित्रपटानं 219 कोटींची कमाई केली तर दरबार या चित्रपटानं 202 कोटींची कमाई केली आहे. टॉप-10 चित्रपटांच्या यादीमध्ये विजय आणि रजनीकांत यांचे तीन चित्रपट सामील आहेत.  


‘विक्रम’ हा चित्रपट जगभरात 3200 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. ‘विक्रम’ हा लोकेश कनागराज दिग्दर्शित अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात विजय सेतुपती, फहाद फासिल, कमल हासन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अभिनेता सुर्याचा या चित्रपटात एक कॅमिओ देखील आहे, यात तो ‘रोलेक्स’ची भूमिका करताना दिसला होता. रिपोर्ट्सनुसार, 150 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 11 दिवसांत भारतातील सर्व भारतीय भाषांमध्ये 220.75 कोटींची कमाई केली आहे. विक्रम चित्रपटामधील डायलॉग्स आणि गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. 


हेही वाचा: