Vikram : अभिनेते कमल हासन (Kamal Haasan) यांचा 'विक्रम' (Vikram) हा चित्रपट दिवसेंदिवस नवनवे रेकॉर्ड मोडत आहे. ‘विक्रम’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवड्यांहून अधिक काळ उलटला आहे. दोन आठवड्यानंतरही हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. विशेषत: तामिळनाडूमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. या चित्रपटाने केवळ तामिळनाडूमध्ये 150 कोटींची कमाई केली आहे. हा या चित्रपटाचा एक नवा विक्रम आहे. ‘विक्रम’ चित्रपटाच्या आधी एसएस राजामौली यांच्या 'बाहुबली 2' ने हा पराक्रम केला होता. मूलतः तेलुगूमध्ये बनलेल्या 'बाहुबली 2' ने राज्यात 146 कोटींची कमाई केली होती.
चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले की, 'विक्रम' हा राज्यातील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'विश्वसम' आणि 'बाहुबली 2'ला मागे टाकून 'विक्रम' लवकरच तामिळनाडूमध्ये सर्वाधिक कमाईचा आकडा पार करून पहिल्या क्रमांकावर पोहोचणार आहे.
‘या’ चित्रपटांनाही टाकले मागे!
'विक्रम' याआधीच तामिळनाडूमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने 'बीस्ट' चित्रपटाच्या 119 कोटींच्या कलेक्शनला मागे टाकले आहे. त्याचवेळी 'केजीएफ चॅप्टर 2' या कन्नड चित्रपटाने तामिळनाडूमध्ये 100 कोटींचा व्यवसाय केला आहे.
'विक्रम'ने जगभरातील कमाईमध्ये 350 कोटींचा टप्पा पार केला आहे. जगभरातील तमिळ चित्रपटाच्या सर्वाधिक कलेक्शनच्या बाबतीत 'विक्रम' आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. ‘थलायवा’ रजनीकांत यांचा ‘2.0’ हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने 655 कोटींची कमाई केली आहे.
बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई!
रिपोर्ट्सनुसार, 150 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 11 दिवसांत भारतातील सर्व भारतीय भाषांमध्ये 220.75 कोटींची कमाई केली आहे. त्याच वेळी, या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 350 कोटी रुपयांचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. ‘विक्रम’ हा चित्रपट जगभरात 3200 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. ‘विक्रम’ हा लोकेश कनागराज दिग्दर्शित अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात विजय सेतुपती, फहाद फासिल, कमल हासन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अभिनेता सुर्याचा या चित्रपटात एक कॅमिओ देखील आहे, यात तो ‘रोलेक्स’ची भूमिका करताना दिसला होता.
हेही वाचा :
Vikram : पुष्पा नंतर आता विक्रमची क्रेझ; क्रिकेटर वॉशिंग्टन सुंदरकडून भन्नाट व्हिडीओ शेअर
Vikram box office day 10 collection : जगभरातील बॉक्स ऑफिसवर 'विक्रम'ची जादू
Vikram : विक्रमच्या यशानंतर सूर्याला कमल हसन यांनी दिलं 'रोलेक्स' घड्याळ; किंमत ऐकून व्हाल थक्क!