Salman Khan : काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि त्याचे वडील लेखक सलीम खान (Salim Khan) यांना धमकीचे पत्र मिळाले होते. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सलमान खानचे वडील सलीम खान हे सकाळी जॉगिंगसाठी गेले होते. तिथे ते एका बेंचवर बसले असता त्यांना एक पत्र मिळालं. ज्यामध्ये त्यांना आणि त्यांचा मुलगा सलमान खानला धमकी देण्यात आली होती. या पत्रात लिहिलं होत की, सलमान खान याचा सिद्धू मुसेवाला करून टाकू. पत्रामध्ये 'एलबी' असा उल्लेखा होता. एलबी हा लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi ) असल्याचा संशय पोलीसांना होता. पोलीस लॉरेन्सची चौकशी करत होते. त्यावेळी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनं असा दावा केला की, 'सलमान खानला मिळालेल्या धमकीच्या पत्रामागे हात नाही'


सिद्धूच्या हत्येनंतर सहा दिवसांनी सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. सकाळी 7:30 ते 8:00च्या सुमारास सलीम खान यांना हे पत्र मिळाले होते. हे धमकीच पत्र मिळाल्यानंतर सलीम खान यांनी वांद्रे पोलीस स्थानकात एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणी आता सलमान खांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. 


सिद्धू मुसेवाला याच्या हत्येचा संबंध लॉरेन्स बिश्नोई टोळीशी होता. त्यामुळे सलमानला मिळालेल्या धमकीच्या पत्रानंतर त्याचे चाहते सोशल मीडियावर चिंता व्यक्त करत होते. लवकरच सलमानचे काही आगामी चित्रपट हे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 'कभी ईद कभी दिवाली', 'टायगर-3' या सलमानच्या आगामी चित्रपटांची वाट सलमानचे चाहते उत्सुकतेने पाहात आहेत. टायगर-3 हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये सलमानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे.  


हेही वाचा: