Salman Khan Death Threat: सलमान खान आणि सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

Salman Khan & Salim Khan Death Threat : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

Continues below advertisement

Salman Khan & Salim Khan Death Threat : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Continues below advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानचे वडील सलीम खान हे सकाळी जॉगिंगसाठी गेले होते. तिथे ते एका बेंचवर बसले असता त्यांना एक पत्र मिळालं. ज्यामध्ये त्यांना आणि त्यांचा मुलगा सलमान खानला धमकी देण्यात आली होती. या पत्रात लिहिलं होत की, सलमान खान याचा सिद्धू मुसेवाला करून टाकू. सकाळी 7:30 ते 8:00 च्या सुमारास सलीम खान यांना हे पत्र मिळाले. हे धमकीच पत्र मिळाल्यानंतर सलीम खान यांनी वांद्रे पोलीस स्थानकात एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. 

अलीकडेच पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. अनेक जणांनी मिळून त्याच्यावर सुमारे 25-30 गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. सिद्धू मुसेवाला यांच्या निधनानंतर संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. दरम्यान, सलमान खानला धमकीचे पत्र आल्यानंतर त्याचे चाहते सोशल मीडियावर चिंता व्यक्त करत आहे. 

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सलमान खानने अलीकडेच पार पडलेल्या IIFA 2022 अवॉर्ड फंक्शन होस्ट केले आहे. सलमान हा अवॉर्ड फंक्शन होस्ट करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आयफा 2022 अबू धाबी येथे पार पडला. यानंतर आता सलमान मुंबईत परतला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Salman Khan Trolled : गिफ्ट देणाऱ्या चाहत्यालाच तोंड वाकडं करून दाखवलं! सलमान खान सोशल मीडियावर होतोय ट्रोल! पाहा Video

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola