Lavraj Kambali Death : 'वस्रहरण' या गाजलेल्या नाटकातून गोप्याची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते लवराज कांबळी (Lavraj Kambali) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मच्छिन्द्र कांबळी यांनी लिहिलेल्या वस्रहरण या नाटकात त्यांनी साकारलेली गोप्या या पात्रावर रसिक प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. लवराज कांबळी यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. मालवणी नटसम्राट म्हणून त्यांनी ओळख मिळवली.
80-90 च्या दशकात गिरणगावात आपल्या कलेच्या जोरावर लव आणि अंकुश कांबळी यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. लवराज हे उत्कृष्ट दिग्दर्शकही होते. लवराज यांच्या जाण्याने मालवणी नाट्यसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मुंबईतील मुलुंड येथील त्यांच्या राहत्या घरी लवराज कांबळी यांनी अखेरचा श्वास घेतला. मुलुंड येथील स्मशानभूमीतच त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले आहेत.
मालवणी प्रेक्षक नाटकापर्यंत पोहचवला
लवराज यांच्या भूमिकांमुळे मालवणी प्रेक्षक खऱ्या अर्थाने नाटकापर्यंत पोहचला. खरंतर ही यादी फार मोठी आहे. मोहन तोंडवळकर , लिलाधर कांबळी अशा अनेक दिग्गजांची नावं या यादीमध्ये आहेत. त्याच यादीमध्ये लवराज यांचा समावेश होता. मालवणी नाटक घराघरात पोहोचवण्याचं मोलाचं कार्य लवराज यांनी केलं आहे. मालवणी नाटक घराघरात पोहोचवण्याचं मोलाचं कार्य लवराज यांनी केलं आहे. त्यामुळे लवराज यांच्या जाण्याने मालवणीच नाही तर महाराष्ट्राच्या बोलीभाषेच्या रंगभूमीला हानी झाली आहे.
साधी राहणी असलेले लवराज
त्यांचा स्वभाव हा प्रेमळ होता तर राहणीमानही अगदी साधं होतं. रेवंडी गावात त्यांचा जन्म झाला. असलेली नाटकाची आवड त्यातून घडवलेली गोप्या ही अजरामर कलाकृती त्यामुळे लवराज हे कायमच मालवणीच नाहीतर मराठी प्रेक्षकांच्याही अमर राहतील ही भावना प्रत्येक नाट्यरसिकाच्या मनात सध्या आहे.
लवराज यांचा नाट्यसृष्टीचा प्रवास
वस्त्रहरण, येवा कोकण आपलाचा आसा, चंपू खानावळीण, देवाक काळजी, वडाची साल पिंपळाक अशा अनेक नाटकांमधून लवराज यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली. कोकणातील रेवंडी गावाचे सुपुत्र असणारे लवराज यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर नाट्यसृष्टीतला हिरा म्हणून ओळख मिळवली. त्याचप्रमाणे त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सेम टू सेम या चित्रपटातही काम केलं आहे. कांबळी परिवाराने मराठी रंगभूमीला जे भरभरुन दान दिलय ते आज इतिहासात चांदण्या म्हणून लखलखेल एवडं भव्य आहे.