Hridaynath Mangeshkar Health Update : गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर(Lata Mangeshkar) यांचे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर (Hridaynath Mangeshkar) यांनी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती नुकतीच त्यांच्या मुलानं म्हणजेच आदिनाथ मंगेशकर (Aadinath Mangeshkar) यांनी दिली आहे. प्रकृती बिघडल्यानं ह्रदयनाथ मंगेशकर यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' सोहळा काल (24 एप्रिल) षण्मुखानंद सभागृहात पार पडला आहे. या पुरस्कार सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना सन्मानित करण्यात आलं. यावेळी आदिनाथ यांनी सांगितलं की, 'प्रकृती ठिक नसल्यानं पंडित हृदयनाथ मंगेशकर हे कार्यक्रमाला उपस्थित नाहित.'


आदिनाथ मंगेशकर यांनी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, त्यांची तब्येत आता पूर्वीपेक्षा चांगले आहेत. दहा दिवसानंतर त्यांना डिस्चार्ज दिला जाणार आहे. तसेच  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हृदयनाथ मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केली. 


पहिल्यांदाच असं होईल रक्षाबंधनाला दीदी नसणार, पुरस्कार स्वीकारल्यानंतर मोदी झाले भावूक
'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारा'ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलं आहे. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी हे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले आहेत की, बऱ्याच वर्षांनी असं पहिल्यांदा होणार, जेव्हा रक्षाबंधनाला दीदी नसणार, असं बोलताना मोदी भावूक झाले होते. 


हेही वाचा :