Meghan Jadhav Marriage: सध्या मनोरंजनसृष्टीत आनंदाचे, सोहळ्यांचे वारे वाहू लागले आहेत. ' लक्ष्मी निवास' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता मेघन जाधव जयंतच्या नकारात्मक भूमिकेमुळे घराघरात पोहोचला. गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या वैयक्तिक आयुष्य मुळे चर्चेत आला आहे. लक्ष्मी निवास मालिकेतील या प्रसिद्ध अभिनेत्याने धुमधडाक्यात लग्न केलं आहे. अभिनेत्री अनुष्का पिंपूटकर (Anushka Pimputkar) सोबत त्याने लग्नगाठ बांधली असून या दोघांच्या लग्न सोहळ्यातील सुंदर क्षणांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
लग्नसोहळा दणक्यात, फोटो व्हायरल
काही दिवसांपूर्वी अभिनेता मेघन जाधव याने अभिनेत्री अनुष्का पिनपुटकर सोबतचे फोटो शेअर करत चाहत्यांना गुड न्यूज दिली होती. दरम्यान, 16 नोव्हेंबर रोजी मेघन आणि अनुष्काने लग्न केलय. मेघनचे आणि अनुष्का सोबतचे फोटो सोशल मीडियावर आल्यानंतर चहा त्यांनीही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मराठमोळ्या पद्धतीने केलेल्या या लग्नात दोघेही देखणे दिसत होते. दोघांनीही पारंपरिक पेहराव घातलेला होता. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर दिसत आहेत. या फोटोमध्ये मेघन जाधव याने ऑफ वाईट रंगाची शेरवानी घातली होती. व त्यावर लाल रंगाचा शेला घेतला होता. तर अनुष्काने लाल रंगाची नऊवारी आणि त्यावर पारंपरिक लुक केला होता. तिचा नऊवारी साज चाहत्यांना प्रचंड आवडला. दोघांनीही मुंडावळ्या बांधल्या आहेत आणि मेघन अनुष्काच्या बोटात अंगठी घालताना दिसत आहे.
मेघन आणि अनुष्काची लव्ह स्टोरी
मेघन आणि अनुष्काची लव्ह स्टोरी रंग माझा वेगळा या मालिकेच्या सेटपासून सुरू झाली. या मालिकेच्या साइटवर आधी त्यांचे चांगली मैत्री झाली व नंतर मैत्रीचा रूपांतर प्रेमात झालं. दोघांनीही घरच्यांना आपल्या नात्याबद्दल एका वर्षाच्या आतच सांगितलं. त्यानंतर अखेर 16 नोव्हेंबरला दोघांनी थाटामाटात लग्न केलं.
मेघनने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर त्याच्या आणि अनुष्काच्या हाताचा फोटो शेअर केला होता. दोघांनी एकमेकांचे हात धरले होते आणि हा फोटो शेअर करताना अभिनेत्यानं हार्ट आणि इव्हिल आयची इमोजीही टाकली होती. त्याचबरोबर अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरनेदेखील इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा आणि मेघनचा एक क्लोज फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये मेघनची झलक स्पष्टपणे दिसत होती. सोशल मीडियावर मेघन आणि अनुष्काचे हे फोटो व्हायरल झाले होते आणि दोघंही लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना अधिकच जोर आला होता. याशिवाय, अनुष्काने मेघनसोबतचे आणखी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.