सातारा (फलटण) :  नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या दिवशी सातारा जिल्ह्यात मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचे पुत्र अनिकेतराजे नाईक निंबाळकर फलटण नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक शिवसेनेकडून लढवणार आहेत. ते शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करतील. दुसरीकडे भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ऐनवेळी त्यांच्या भावाला नगराध्यपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळं फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे. 

Continues below advertisement

रामराजेंचे अखेर ठरलं, मुलगा शिवसेनेकडून लढणार

रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेतराजे नाईक निंबाळकर धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादीत असतानाच त्यांचे चिरंजीव मात्र शिवसेनेत धनुष्यबाणावर निवडणूक लढवणार आहेत. ते थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. फलटण नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी भाजप विरुद्ध शिवसेना यांच्यात लढाई होणार आहे. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळं आता फलटणमध्ये होणार निंबाळकर विरुद्ध निंबाळकर लढाई होणार आहे. 

भाजपकडून समशेरसिंह नाईक निंबाळकर रिंगणात  

भाजपकडून माढाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मोठे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना फलटणच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे. दिलीप सिंह भोसले यांचा पत्ता कट करून समशेर सिंह नाईक निंबाळकर यांना ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली आहे. फलटणला भाजपच्या वतीने समशेर सिंह नाईक निंबाळकर नगराध्यक्ष पदासाठीची उमेदवारी देण्यात आली आहे.

Continues below advertisement

फलटण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर भारतीय जनता पार्टी,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्रपक्ष यांच्या वतीने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मोठे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.  ते काही वेळेत फलटण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करणार असल्याचे दिलीपसिंह भोसले यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.

फलटणमध्ये निंबाळकर विरुद्ध निंबाळकर सामना 

फलटणमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला होता. काही दिवसांपूर्वी दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन होणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्यात पुढं काही घडलं नाही. आता पुन्हा दोन्ही निंबाळकर आमने सामने आले आहेत.