Lagnachi Ghay Song : सध्या एका पेक्षा एक गाणी संगीतप्रेमींच्या भेटीला येत आहेत. प्रेक्षकही आवडलेल्या गाण्यांना मनमुराद दाद देत असल्यानं नवनवीन अल्बम बनवण्यासाठी कलाकारांचाही हुरूप वाढताना दिसत आहे. आजवर नेहमीच आपल्या विविधांगी भूमिकांमुळे चर्चेत राहणारा महाराष्ट्राचा लाडका अभिनेता प्रथमेश परब  (Prathamesh Parab) सध्या आपल्या आगामी व्हिडीओमुळं चर्चेत आला आहे. प्रथमेशला आता 'लग्नाची घाय' लागली आहे. 'लग्नाची घाय' (Lagnachi Ghay Song) हे प्रथमेशचं गाणं रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालं आहे. लय भारी म्युझिकचं हे गाणं अनेकांना ताल धरायला लावेल.


'बॅायफ्रेंड पक्का सेल्फीश...' या गाण्याच्या यशानंतर लय भारी म्युझिकच्या बॅनरखाली निर्माते अनिल गोविंद पाटील यांनी 'पोरीला लागलेय लग्नाची घाय...' हे नवं कोरं गाणं संगीतप्रेमींच्या भेटीला आणलं आहे. लय भारी म्युझिकची प्रस्तुती असलेल्या 'बॅायफ्रेंड पक्का सेल्फीश...' या गाण्याला रसिकांच्या पसंतीची पावती मिळाली आहे. अवघ्या दोन महिन्यांमध्ये एक लाख 35 हजार इन्स्टाग्राम रील्स आणि 10 मिलियन्स व्ह्यूज हे आकडे या गाण्याचं यश अधोरेखित करण्यासाठी पुरेसे आहेत. रसिक मायबापाकडून मिळालेल्या याच प्रेमाच्या बळावर लय भारी म्युझिक 'पोरीला लागलेय लग्नाची घाय...' हे गाणं घेऊन आलं आहे. या गाण्यात प्रथमेशच्या जोडीला कोमल खरात हा नवा चेहरा लक्ष वेधून घेत आहे. प्रथमेश-कोमलची अगदी सहज जुळणारी या गाण्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना मोहिनी घालणारी आहे. दोघांची जोडी अगदी शोभून दिसते. प्रथमेश आणि कोमलचा डान्स तरुणाईलाच नव्हे, तर सर्वच वयोगटातील रसिकांना आकर्षित करणारा आहे. 



बॅाब आणि कोमल यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे. बॉब आणि कोमल हे लय भारी म्युझिकचे चॅनेल हेडही आहेत. गीतकार राज इरमाली यांनी लिहिलेलं हे गाणं, राज इरमाली आणि सोनाली सोनावणे यांनी गायलं असून, राज इरमाली यांनी संगीतबद्ध केलं आहे. किशोर दळवी यांनी या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. यंदाच्या लगीनसराईत हे गाणं अनेकांना ताल धरायला लावणार आहे.


महत्वाच्या बातम्या 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha