Kushal Badrike : चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) फेम अभिनेता आणि विनोदवीर कुशल बद्रिके (Kushal Badrike) हा एका नव्या कोऱ्या हिंदी रिअॅलिटी शोमध्ये झळकणार आहे. नुकतच त्याने या शोचा एक प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. त्याच्या चाहत्यांनी देखील यावर कमेंट्स करत कुशलला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. सोनी टिव्हीवर 'मॅडनेस माचऐंगे' असा एक नवा कोरा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमधून कुशल देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कुशलने आजवर त्याच्या विनोदांनी आणि विनोद शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं आणि त्यांचं मनोरंजनही केलंय. 


मराठीनंतर आता कुशल एका हिंदी रिअॅलिटी कार्यक्रमाच्या माध्यमातून तो त्याचे विनोद प्रेक्षकांसाठी सादर करणार आहे. नुकतच त्याने त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तयार असल्याचं त्याने म्हटलंय. तसेच हा प्रोमो शेअर करत कुशलने म्हटलं की, 'एका हिंदी मालिकेतून तुम्हाला हसवण्या साठी येतो आहे तुमचं प्रेम आणि आशीर्वाद सोबत असूद्या.'






कुशल चला हवा येऊ द्या कार्यक्रम सोडणार?


दरम्यान कुशलच्या या नव्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर सध्या अनेक प्रश्न प्रेक्षकांकडून विचारले जात आहे. कुशल आता चला हवा येऊ द्याला कायमचा निरोप देणार की तो हवा येऊ द्यामध्येही त्याच्या विनोदाची जादू कायम ठेवणार आहे, असा प्रश्न सध्या प्रेक्षक विचारत आहेत. तसेच जशी छाप कुशलने मराठी सिनेसृष्टीत पाडली तशीच विनोदाची छाप कुशल हिंदी सिनेसृष्टीतही पाडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे कुशलच्या या नव्या कार्यक्रमाची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे. तसेच हा कार्यक्रम सोनी टिव्हीवर प्रक्षेपित करण्यात येणार आहे. 






ही बातमी वाचा : 


Sara Kahi Tichyasathi : नीरजच्या अपहरणाचं सत्य रघुनाथ खोतांना कळलं? खोतांच्या घरात आता कोणतं नवं वादळ येणार? 'सारं काही तिच्यासाठी' मालिका रंजक वळणावर