Pune Crime News : पुणे शहरातून (Pune City) एक धक्कादायक बातमी समोर येत असून, वाघोली पोलीस चौकीसमोर पेटवून घेतलेल्या तरुणाचा अखेर मृत्यू झाला आहे. पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करत या तरुणाने काही दिवसांपूर्वी ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून स्वतः ला पेटवून घेतले होते. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असतानाच आज त्याचा मृत्यू झाला आहे. रोहिदास अशोक जाधव (वय 32 वर्ष, रा. वाघोली) असे मयत तरुणाचे नाव आहे. तर,  13 फेब्रुवारी रोजी रोहिदासने शहरातील वाघोली पोलीस चौकीसमोर पेटवून घेतले होते. 


मारहाण करणाऱ्यावर पोलिसांनी काय कारवाई केली, याची चौकशीसाठी आलेल्या रोहिदासला पोलिसांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत त्याने पोलीस चौकीसमोरच स्वतः ला पेटवून घेतले. ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून त्याने स्वतःला पेटवून घेतलं होतं. त्याने दिलेल्या तक्रारीत पोलिस योग्य ती कारवाई करत नसल्याने पोलिसांचे नाव घेत या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याने लोणी कंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या वाघोली पोलीस चौकीसमोर त्याने स्वतःवर डिझेल टाकून पेटवून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आज त्याचा उपचार सुरु असतानाच मृत्यू झाला आहे. 


नेमकं काय आहे प्रकरण? 


पुण्यातील लोणी कंद पोलीस ठाणेअंतर्गत येणाऱ्या वाघोली पोलीस चौकीच्याबाहेर रोहिदास जाधव नावाच्या तरुणाने 13 फेब्रुवारी रोजी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पोलिसांवर आरोप करत त्याने स्वतःवर डिझेल टाकून जाळून घेतलं होतं. या तरुणावर शहरातील सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. या घटनेनंतर हॉस्पिटलच्या बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विशेष म्हणजे पोलिसांचे नाव घेत रोहिदास जाधव या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.  यामध्ये तो 90 टक्के भाजला होता. तेव्हापासून त्याच्यावर उपचार करण्यात येत होते. दरम्यान, सात दिवसांनी उपचार सुरु असतानाच रोहिदास याचा आज मृत्यू झाला आहे. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. 


दोघांवर निलंबनाची कारवाई... 


मारहाण प्रकरणात कारवाईची माहिती घेण्यासाठी आलेल्या रोहिदासला पोलिसांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा त्याने आरोप केला होता. त्यामुळे त्याने स्वतः ला थेट पोलीस चौकीच्या समोरच पेटवून घेतले होते. या घटनेनंतर पोलीस दलावर टीका होत होती. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेत लोणी कंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची तडकाफडकी बदली केली होती. तसेच, याच प्रकरणी दोन पोलीस कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Pune News : खवले मांजर तस्करी पडली महागात; 7 जणांना वन कोठडी