Continues below advertisement

Kriti Sanons Sister Nupur Sanon Marries Singer:बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननची धाकटी बहीण नुपूर सेननलग्नबंधनात अडकली आहे. तिनं प्रियकर आणि लोकप्रिय गायक स्टेबिनबेनशी ख्रिश्चन पद्धतीने लग्नगाठ बांधली. सध्या या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओसोशलमीडियातव्हायरल होत आहे. कुटुंब आणि सिनेसृष्टीतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या लग्नसोहळ्यासाठी खास अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. या व्हाईट गाऊनमध्ये अभिनेत्री सुरेख दिसत होती. दोघांचा हा विवाहसोहळाउदयपूरमध्ये पार पडला असल्याची माहिती आहे. दरम्यान, लग्नानंतर कॉकटेलपार्टीचंही आयोजन करण्यात आलं. सध्या दोघांचे लग्नातील फोटोसोशलमीडियातव्हायरल होत आहे.

अभिनेत्री नुपूर सेननने ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला

अभिनेत्री नुपूर सेनन आणि गायक स्टेबिन बेन या दोघांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा सुंदर गाऊन परिधान केला होता. तर, स्टेबिननेपांढऱ्याक्रिम रंगाचा सूट घातला होता. दोघे प्रचंड आनंदात आहेत. दोघांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत आहे. ईटाइम्समधील एका वृत्तानुसार, नुपूससेनन आणि स्टेबिन बेन यांनी शनिवारी उदयपूरमध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. या सोहळ्यात मोजक्या लोकांना आमंत्रण होते. कुटुंब आणि काही जवळचे नातेवाईक या लग्न सोहळ्यात उपस्थित होते.

शाही लग्नानंतर कॉकटेलपार्टीचे आयोजन

दरम्यान, या लग्नानंतर सायंकाळी एका ग्लॅमरसकॉकटेलपार्टीचे आयोजन करण्यात आले. ही पार्टी अनेकांनी आनंदात साजरी केली. या पार्टीला देखील मोजकेच लोक उपस्थित होते. या लग्नाचे आणि पार्टीचेफोटोसोशलमीडियात तुफान व्हायरल होत आहे. यावेळी नुपूर सेननची बहीण कृती सेननहिनं कार्यक्रमात ठुमके लगावले. या लग्नसोहळ्यातील अनेक व्हिडिओ आणि फोटोसोशलमीडियातव्हायरल होत आहे.

लग्नाआधी गुडघ्यावर बसून प्रपोज

दरम्यान, लग्नाआधी 3 जानेवारीलास्टेबिनबेनने नुपूरला लग्नासाठी प्रपोज केले होते. स्टेबिनने एका गुडघ्यावर बसून नुपूरच्या बोटामध्ये अंगठी घातली होती. आज त्यांचा विवाहसोहळा पार पडला. या कपलचं लग्न उदयपूर येथील फेअरमोंटपॅलेसमध्ये पार पडले. दोघांच्या रॉयल वेडिंगचे अनेक फोटोसोशलमीडियात वेगाने व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी पोस्टवर कमेंट करून शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

रिल स्टारपासून स्टेजवर धुमाकूळ घालणाऱ्या विनोदी कलाकारांपर्यंत! बिग बॉस मराठीत रंगणार खरा कल्ला; कोण आहेत 17 स्पर्धक?