माणगाव: माणगाव पुणे मार्गावर ताम्हिणी घाटात तरुणाच्या खुनाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणाच्या शरीरावरती धारदार शस्त्रांनी खून करून मृतदेह ताम्हिणी (Tamhini Ghat Crime News) घाटातील आडमार्गाला फेकून देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या तरुणाच्या मृतदेहावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा (Tamhini Ghat Crime News) आहेत. माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याकरिता फॉरेन्सिक लॅबला पाचारण करण्यात आले आहे. हा संपूर्ण प्रकार (Tamhini Ghat Crime News) याच परिसरातील ग्रामस्थ त्यांच्या नातेवाईकांना जमीन दाखवण्यासाठी गेले असता रक्तबंबाळ अवस्थेतील या तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृतकाचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह इथं टाकून देण्यात आला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. या घटनेचा अधिक तपास माणगाव पोलिस करत आहेत.(Tamhini Ghat Crime News)

Tamhini Ghat Crime News:  घटना नेमकी कशी आली समोर?

ताम्हिणी घाटातील स्थानिक ग्रामस्थ आपल्या नातेवाईकांना परिसरातील जमीन दाखवण्यासाठी जंगलाच्या भागातील एका आडमार्गावरती गेले होते. यावेळी त्यांना तिथे एका तरुणाचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह दिसून आला. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी तातडीने माहिती देण्यात आली, त्यावेळी त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची पाहणी केली, त्यावेळी तरूणाच्या मृतदेहावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या अनेक खुणा आढळून आल्या आहेत. आरोपींनी तरुणाची हत्या दुसऱ्या ठिकाणी करून, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आणि पुरावा नष्ट करण्यासाठी हा मृतदेह ताम्हिणी घाटात टाकला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मृत तरूणाची ओळख अद्याप पटलेली नाही.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबच्या पथकाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळावरून सर्व पुरावे गोळा करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले असून, मृताची ओळख पटवण्यासाठी पुणे आणि रायगड जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची पडताळणी केली जात आहे. या घटनेमुळे ताम्हिणी घाट परिसरात पर्यटकांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.