Ketaki Mategaonkar about Fans Messages: टाईमपास चित्रपटातून घराघरात पोहोचणारी अभिनेत्री केतकी माटेगावकरनं अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. फक्त चित्रपट नाही तर, गायन क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली. रवी दिग्दर्शित टाईमपास चित्रपटामुळे तिला खरी ओळख मिळाली. या चित्रपटात तिनं प्राजू उर्फ प्राजक्ता ही भूमिका साकारली होती. प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर या दोघांची जोडी प्रेक्षकांना आवडली. दगडू आणि प्राजू या जोडीचं नाव अजूनही लोक आवर्जून काढतात. अलिकडेच सिनेमातील काही किस्से तिने शेअर केले. एका मुलाखतीत केतकीनं टाइमपास चित्रपटात प्राजक्ता ही भूमिका साकारताना काय गंमती घडल्या, याची माहिती दिली. परंतु, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मुलांच्या मेसेजमुळे तिला प्रचंड त्रास झाला होता. याचा खुलासा तिनं अलिकडेच मुलाखतीत केला.
केतकीला मिळाली प्राजक्तामुळे खरी ओळख
मुलाखतीत केतकीनं सांगितलं की, "प्राजक्ता या पात्राला खूप प्रेम मिळालं. हे पात्र लोकांना खरं वाटायचं. अनेक मुलांचे लग्नासाठी मागणी आली. माझ्या वडिलांच्या अकाऊंटवर मेसेज करायचे. मुलांचे बायोडेटा आणि पत्रिका पाठवायचे. मुलगा आयटीमध्ये आहे, इंजिनिअर आहे, असं सांगून लग्नासाठी मागणी घालायचे. याचा प्रचंड त्रास व्हायचा", असं केतकी म्हणाली. मुलांच्या मेसेजमुळे तिचे कुटुंब देखील कचाट्यात सापडले होते. क्लास जाताना केतकीच्या मागे मुलं लागायचे. त्यामुळे केतकीला तिचे वडील क्लासला सोडायला जायचे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एकंदरीत तिनं घराबाहेर पडणं अवघड झालं होतं.
मुलांचा त्रास, शिक्षणासाठी भारत सोडलं
याच त्रासाला कंटाळून तिनं भारत सोडण्याचा निर्णय घेतला. प्राजक्ताने पुढचं शिक्षण अमेरिकत केलं. अमेरिकेत ती एक सामान्य भारतीय नागरीक म्हणून जगत होती. तिला तिथे कुणीच प्राजक्ता म्हणून ओळखत नव्हतं. तिला तिथे एक सर्वसामान्य विद्यार्थी म्हणून आयुष्य जगता आलं. पण भारतात तिला प्रचंड त्रासाचा सामना करावा लागला.
मालिकेत मिळाली गायनाची संधी
केतकी माटेगावकरला खरी ओळख टाइमपास या चित्रपटामुळे मिळाली. ती सोशल मीडियातही सक्रीय असते. तिच्याबद्दल सांगायचं झाल्यास, तिनं नुकतंच झी मराठीवरील आघाडीची मालिका सावळ्याची जणू सावलीमध्ये, सावली या पात्राला स्वत:चा आवाज दिला. तसेच या मालिकेतील विठ्ठलाची गाणी देखील तिने गायली आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या: