Seema Deo : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे आज निधन झाले. त्या 81 वर्षांच्या होत्या. गेल्या काही काळापासून त्यांना अल्जायमर होता. सीमा देव यांनी वांद्रे येथील राहत्या घरी आज सकाळी 7 वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजन जगताची मोठी हानी झाली आहे.


सीमा देव यांचा जन्म मुंबईतील गिरगाव या ठिकाणी 27 मार्च 1940 साली झाला होता. त्यांचे माहेरचे नाव नलिनी सराफ अस होते. तर त्यांनी आजवर 80 हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. गेल्या काही काळापासून सीमा त्यांचा मुलगा अभिनय देव यांच्यासोबत मुंबईतील वांद्रे याठिकाणी राहत होत्या. अभिनवदेखील मनोरंजन विश्वात दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहेत. सीमा यांच्या पार्थिवावर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. 1956 मध्ये प्रदर्शित झालेल्या आलिया भोगासी या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. आनंद, जगाच्या पाठीवर,यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, हा माझा मार्ग एकला चित्रपटांमध्ये सीमा यांनी काम केलं. आनंद, जगाच्या पाठीवर, मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला हे त्यातले काही उल्लेखनीय चित्रपट. राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या भूमिका असलेल्या हृषिकेश मुखर्जी यांच्या ‘आनंद’ सिनेमातील त्यांची भूमिका छोटी परंतु त्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले.


सीमा देव- रमेश देव यांची जोडी


या जोडीचा पहिला चित्रपट हीट झाल्यानंतर दोघांनी मिळून अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. याती काही चित्रपटांनातर प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतलं होतं. यातील 1962 सालचा‘वरदक्षिणा’ हा चित्रपट देखील एक ब्लॉकबस्टर ठरला. याच चित्रपटात दोघांचे बंध जुळले. ज्यानंतर 1 जुलै, 1963 रोजी हे दोघेही विवाह बंधनात अडकले. 2013 मध्ये लग्नाचा 50 वा वाढदिवस साजरा करताना रमेश यांनी त्यांची पत्नी सीमासोबतची केमिस्ट्री कमाल होती, त्यामुळे ते एकत्र सिनेमांत काम करताना अगदी नैसर्गिक आणि रिअल वाटायचं असं रमेश म्हणाले. 


सीमा देव यांच्या गाजलेल्या चित्रपटांची यादी 


 मियाँ बीबी राज़ी (1960)


जगाच्या पाठीवर (1960)


भाभी की चुडियाँ (1961)


मोलकरीण (1963)


दस लाख (1966)


सरस्वतीचंद्र (1968)


आनंद (1971)


कोशिश (1972)


नसीब अपना अपना (1986)


संसार (1987)


कोरा कागज (1974)


संबंधित बातमी : 


Seema Deo: ब्लॅक अँड व्हाईट सिनेमात अभिनयाचे रंग भरणारी अभिनेत्री कालवश; सीमा देव यांना राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली