Bollywood Celebrities On Chandrayaan 3 : 'इस्रो' (Isro) आज इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. भारताची महत्त्वाकांक्षी 'चांद्रयान-3' (Chandrayaan 3) मोहीम पूर्णत्वास येण्याचा क्षण आता जवळ आला आहे. भारताचे चंद्रावर आज पहिले पाऊल पडणार असून या ऐतिहासिक प्रसंगाची प्रत्येक भारतीय आतुरतेने वाट पाहत आहे. सर्वसामान्यांसह बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील 'इस्रो'ला (Isro) शुभेच्छा दिल्या आहेत. करीना कपूरपासून (Kareena Kapoor) मनोज जोशीपर्यंत (Manoj Joshi) अनेक सेलिब्रिटींनी इस्रोला शुभेच्छा दिल्या आहेत. 


बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor), मनोज जोशी (Manoj Joshi) आणि गायिका शिबानी कश्यप (Shibani kashyap) यांनी भारताच्या 'चांद्रयान-3' मोहीमेवर भाष्य केलं आहे. 'चांद्रयान-3'बद्दल बोलताना करीना कपूर (Kareena Kapoor On Chandrayaan 3) म्हणाली,"चांद्रयान-3' या मोहिमेचं मी समर्थन करते". 


करीना कपूर पुढे म्हणाली,"चांद्रयान-3'चं लॅण्डिंग मी माझ्या मुलांसोबत पाहणार आहे. प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. आपल्याला अभिमान वाटावा असा हा क्षण असणार आहे. प्रत्येक भारतीय सध्या 'चांद्रयान-3' लॅण्डिंगच्या प्रतीक्षेत आहे. हा क्षण मी माझ्या मुलांसोबत अनुभवणार आहे". 






मनोज जोशीने शेअर केला व्हिडीओ


अभिनेते मनोज जोशी यांनीदेखील 'चांद्रयान-3'बद्दलचा (Manoj Joshi On Chandrayaan 3) एक व्हिडीओ शेअर केला आहे. मनोज जोशी म्हणाले,"प्रत्येक भारतीय नागरिकाप्रमाणे 'चांद्रयान-3'या प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रत्येकाबद्दल खूप अभिमान वाटतो आहे. 'चांद्रयान -3' मोहिमेत सहभागी असलेल्या प्रत्येक शास्त्रज्ञाच्या मेहनतीवर आमचा विश्वास आहे. 'चांद्रयान-3' यशस्वी व्हावं यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत". 






अमिताभ बच्चन 'चांद्रयान-3'बद्दल बोलताना (Amitabh Bachchan Prayer For Chandrayaan 3) म्हणाले,"चंद्रावर भारताचं पहिलं पाऊल पडणार... भारत इतिहास रचणार". लोकप्रिय गायिका शिबानी कश्यपने (Shibani kashyap) 'दिल है छोटा सा, छोटी सी आशा' हे गाणं गात 'चांद्रयान-3' मोहिमेला शुभेच्छा दिल्या आहेत. भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष 'चांद्रयान-3'च्या लॅण्डिंगकडे लागलं आहे. रितेश देशमुख म्हणाला,"चांद्रयान-3'च्या लॅण्डिंगसाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. अभिमान वाटावा असा हा क्षण आहे. संपूर्ण कुटुंबियांसोबत मी चांद्रयान-3 चं लाईव्ह प्रक्षेपण पाहणार आहे.


अभिनेता परेश रावल (Paresh Rawal म्हणाला,"चांद्रयान-3'चं लॅण्डिंग भारतासाठी ऐतिहासिक आणि गौरवशाली क्षण आहे. कमी खर्चात चांगले काम कसे करता येते हे भारताने जगाला दाखवून दिलं आहे". तर आयुष्मान खुराना म्हणाला,"चांद्रयान-3' मोहीम ही अभिमानाची बाब आहे. भारतीयांसह हा अभिमानास्पद आणि आनंदाचा क्षण असणार आहे". कृती सेनन म्हणाली,"आज एक भारतीय असल्याचा आनंद होत आहे. 'चांद्रयान-3'चं लॅण्डिंग ही भारतीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे. 'चांद्रयान-3'चं लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे".


भारताचं चांद्रयान-३ आज संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांच्या ठोक्याला चंद्रावर लॅण्ड होणार आहे. त्यानंतर चांद्रमोहीम यशस्वी करणाऱ्या चार देशांमध्ये भारताचं नाव गौरवानं घेतलं जाणार आहे. भारतासाठी अत्यंत अभिमानाचा, स्वाभिमानाचा आणि गौरवाची असलेली चांद्रयान-३ मोहीम आता शेवटच्या टप्प्यात आहेत.


संबंधित बातम्या


Chandrayaan 3: इतिहासाची आस, लॅण्डिंगचा ध्यास; चांद्रयान-3 साठी शेवटची 15 मिनिटं धोक्याची, नेमकं काय होणार शेवटच्या 900 सेकंदात?