Share Market Opening : आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसत आहे. शेअर बाजार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्स वधारला. प्री-ओपनिंग सत्रात बाजारातील तेजीचे संकेत दिसून आले. आयटी, बँकिंग, मेटल शेअरचे दर चांगलेच वधारले आहेत.
आज देशांतर्गत शेअर बाजार सेन्सेक्समध्ये 740.91 अंकांनी वधारत 53,468.89 अंकांवर खुला झाला. तर, एनएसईचा निफ्टी निर्देशांक 226.95 अंकांनी वधारला आहे. निफ्टी निर्देशांक 15,926.20 अंकांवर खुला झाला.
आज बाजारात सुरू असलेल्या खरेदीच्या सपाट्यामुळे 'निफ्टी 50' मधील सर्व कंपन्यांचे शेअर दर वधारले आहेत. बँक निफ्टी निर्देशांकात 413 अंकांची तेजी दिसून आली आहे. तेजीमुळे बँक निफ्टी निर्देशांक 34,041 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.
आज बाजारात निफ्टीतील सर्व सेक्टोरिअल इंडेक्समध्ये तेजी दिसून येत आहे. आयटी शेअरमध्ये 2.80 टक्क्यांची तेजी दिसत आहे. तर, मीडिया शेअर दरात 1.5 टक्क्यांनी वधारला आहे. मेटल क्षेत्रात 1.47 टक्क्यांनी वधारला आहे. निफ्टी बँक क्षेत्र 1.31 टक्क्यांनी वधारला आहे. तर, वित्तीय सेवांच्या शेअर दरात 1.33 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
दरम्यान, शुक्रवारी शेअर बाजार निर्देशांक वधारत बंद झाला. सेन्सेक्स 463 अंकांच्या वाढीसह 52,729 अंकांवर, तर निफ्टी 145 अंकांच्या वाढीसह 15,702 अंकांवर बंद झाला होता. शेअर बाजारात आज आयटी क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रांत खरेदी दिसून आली. बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी, ग्राहकोपयोगी वस्तू, ऊर्जा, तेल आणि वायू क्षेत्रात खरेदी दिसून आली. मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागांमध्येही वाढ झाली आहे. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 41 शेअर्स वाढीसह बंद झाले. तर नऊ शेअर्समध्ये घसरण झाली आहे. सेन्सेक्समधील 30 शेअसर्सपैकी सहा शेअर घसरले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या: