Kiran Mane on Rahul Gandhi : लोकसभेचा निकाल लागल्यानंतर सुरु झालेल्या संसंदेचं अधिवेशन हे बऱ्याच मुद्द्यावरुन गाजतंय. त्यातच विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वक्तव्यामुळे लोकसभेत बराच गदारोळ झाला. राहुल गांधी यांनी जेव्हा हे वक्तव्य केलं त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) देखील लोकसभेत होते. त्यांनी देखील राहुल गांधींच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. या सगळ्यावर मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत आली आहे. 


संसदेत झालेल्या गदारोळावर कलाकार देखील आता व्यक्त होत आहेत. अभिनेत्री केतकी चितळे हीने पोस्ट करत राहुल गांधींच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. पण आता अभिनेते किरण माने यांनी राहुल गांधींच्या समर्थनार्थ पोस्ट केली आहे. किरण माने यांची ही पोस्ट सध्या बरीच चर्चेत आलीये. 


किरण माने यांनी काय म्हटलं?


किरण माने यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की, "तुम्ही सगळ्या हिंदुंचा ठेका घेतला नाही.आम्हीही हिंदु आहोत. आमचा धर्म आम्हाला हिंसा आणि द्वेष शिकवत नाही. तुम्ही सांगता तो धर्म आमचा नाही !" भाजपाच्या खोट्या हिंदुत्वाच्या चिंध्या केल्या काल राहुलजींनी ! संसद हलवून सोडली. ज्याला पप्पू ठरवायला दहा वर्षांत हजारो कोटी रूपये खर्च केले, त्याने एका दिवसांत धर्माच्या नांवावरून भ्रष्टाचाराचा धंदा मांडणार्‍या या दांभिकांच्या अब्रूची लक्तरं करून चव्हाट्यावर आणली. काँग्रेस भाजपासे नहीं डरती और न उसे किसी को डराने देगी ।" 



राहुल गांधी यांनी काय म्हटलं होतं?


 राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना म्हटलं की, 'नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात एका दिवशी म्हटलं की हिंदुस्ताननं कधी कुणावर आक्रमण केलं नाही. याचं कारण आहे हिंदुस्तान अहिंसेचा देश आहे. आपल्या महापुरुषांनी डरो मत, डराओ मत असं म्हटलं. भगवान शंकर म्हणतात डरो मत, डराओ मत आणि त्रिशुल जमीन रोवतात. दुसरीकडे जे लोक स्वत:ला हिंदू म्हणतात ते 24 तास हिंसा-हिंसा-हिंसा, नफरत-नफरत-नफरत, तुम्ही हिंदू असूच शकत नाही, हिंदू धर्मानं स्पष्टपणे म्हटलंय सत्याची साथ द्या.'               


ही बातमी वाचा : 


Ketaki Chitale : राहुल गांधींच्या संसदेतील वक्तव्यावर केतकी चितळे संतापली, दातओठ खात म्हणाली, 'आमचे देव हिंदू...'