Kiran Mane : मराठी बिग बॉसच्या (Marathi Bigg Boss Season 5) पाचव्या सिझनची घोषणा झाली आणि प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली. रितेश देशमुखची एन्ट्री हे या सिझनचं पहिलं सरप्राईज प्रेक्षकांना मिळालं. त्यानंतर या सिझनमध्ये बिग बॉसच्या घरात कोण कोण दिसणार याचीही प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. मागील दोन वर्षांपासून प्रेक्षक या सिझनची वाट पाहत होते. अखेरीस हा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण सध्या एक वेगळीच चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. 


बिग बॉस मराठी सिझन 4 च्या घरात किरण माने यांची एन्ट्री झाली होती. पण सध्या त्यांच्या एका पोस्टमुळे पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरातील त्यांच्या एन्ट्रीची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान त्यांनी बिग बॉसच्या घरातील काही सदस्यांसोबतही फोटो पोस्ट केलाय. त्यामुळे बिग बॉसच्या मागच्या चार सिझनमधलेच स्पर्धक पुन्हा एकदा पाचव्या सिझनमध्ये दिसणार का याची देखील चर्चा सुरु आहे. 


किरण मानेंची पोस्ट नेमकी काय?


किरण मानेंनी त्यांच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये रितेश देशमुखचं कटआऊट दिसत असून बिग बॉसच्या होस्टची खुर्ची देखील दिसत आहे. या फोटोला त्यांनी काहीतरी शिजतंय, असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे किरण मानेंच्या बिग बॉसच्या घरातील एन्ट्रीच्या सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. तसेच त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर बिग बॉसच्या घरातील काही माजी सदस्यांसोबतचा फोटो शेअर केला आहे.  यामध्ये शर्मिष्ठा राऊत, शिव ठाकरे, अक्षय केळकर ही मंडळी दिसत आहेत. 





महाराष्ट्रात पुन्हा घुमणार बिग बॉसचा आवाज


हिंदीमधल्या अफाट यशानंतर 'बिग बॉस' हा कार्यक्रम मराठीतही सुरु झाला. “बिग बॉस मराठी”चा आवाज संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरांत जाऊन पोहोचला. प्रेक्षक या कार्यक्रमावर बेहद फिदा झाले. “बिग बॉस मराठी” च्या पहिल्या चार सिझनने मराठी प्रेक्षकांची तुफान मने जिंकली आणि मराठमोळ्या थिमसह बिग बॉसच्या चारही सिझनची जोरदार चर्चा झाली. आता त्याच 'बिग बॅास' मराठीच्या नव्या सिझनची जोरात तयारी सुरू झालीय.     


'बिग बॅास'चे घर ही नेहमीच रसिकांच्या औत्सुक्याची, कुतूहलाची बाब असते. बिग बॅास मराठीचे हे आलिशान घर आकार घेऊ लागले आहे. तसेच बिग बॅासच्या घरातील अतरंगी मोहरे यांचीही कसून निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. या सिझनमध्ये 'बिग बॅास'च्या या घरात आणखी काय काय नाविन्य असेल, काय एक्स्ट्रा गॅासिप अर्थात एक्स्ट्रा मनोरंजन पहायला मिळणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे


ही बातमी वाचा : 


Salman khan : घरावरील गोळीबारानंतर आता भाईजानला जीवे मारण्याची धमकी, सायबर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल