Kiara Advani Sidharth Malhotra Announce Pregnancy: बॉलिवूडचं (Bollywood) क्युट कपल म्हणजे, किआरा अडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra). दोघांच्या घरी आता लवकरच पाळणा हलणार असून यासंदर्भात कपलनं सोशल मीडियावर (Social Media) माहिती दिली आहे. दोघेही आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार असून ही गोड न्यूज दोघांनीही इन्स्टावर पोस्ट करुन शेअर केली आहे. 


किआरा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी एक क्युट फोटोही शेअर केला आहे. फोटोमध्ये दोघांनी हातांची ओंजळ केली असून त्या ओंजळीत इटुकले पिटुकले लोकरीनं विणलेले मौजे दिसत आहेत. त्यासोबत दोघांनी एक कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये "The greatest gift of our lives👼 Coming soon..."






2023 मध्ये कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले. 7 फेब्रुवारीला राजस्थानमध्ये दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला होता. आता लग्नाच्या दोन वर्षांनी दोघांनी चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे. लवकरच दोघेही आई-बाबा होणार असून घरात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. 


सिद्धार्थ, किआराच्या पोस्टनंतर चाहत्यांकडून त्यांच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. एका युजरनं इमोशनल होऊन कमेंट केलीय की, "बेबीजला एक बेबी होने जा रहा है..." आणखी एका युजरनं म्हटलं आहे की, "मेरा दिल फट जाएगा। आप दोनों को बधाई। थू थू थू (नजरबट्टू इमोजी के साथ)।" आणखी एकानं म्हटलं की, "बेस्ट माता-पिता बनने जा रहे हैं।", तर एका युजरनं म्हटलं की, "फ्राईडे स्पेशल। उन्होंने बेस्ट न्यूज शेयर की है।" 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Malaika Arora Mahesh Bhatt Viral Video: महेश भट्ट यांच्यासोबत मलायका अरोराचं रोमॅन्टिक शूट? सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल