Surya Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य (Sun) ग्रह प्रत्येक महिन्याला राशी परिवर्तन करतो. त्यानुसार, येत्या 14 मार्च रोजी सूर्य ग्रहाचं संक्रमण होऊन मीन राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचं हे संक्रमण आयुष्यात मोठा बदल घडवून आणणारा आहे.
सूर्याच्या मीन राशीत प्रवेश केल्याने ग्रहांचा राजा सूर्याची शुक्र आणि बुध ग्रहाबरोबर युती होणार आहे. यामुळे शुक्रादित्य आणि बुधादित्य राजयोग जुळून येणार आहे. हा योग 3 राशींच्या लोकांसाठी फार शुभकारक असणार आहे.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्याचं संक्रमण फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती झालेली दिसेल. तसेच, देवी लक्ष्मीची तुमच्यावर चांगली कृपा राहील. तुम्हाला धनलाभ होईल. तसेच, तुमच्या उत्पन्नात देखील वाढ होणार आहे. या काळात तुमचं लव्ह लाईफ अगदी चांगलं चालणार आहे. तुमच्या पार्टनरबरोबर तुम्ही सामंजस्याने व्यवहार कराल. सूर्याच्या राजयोगामुळे या राशींचे लवकरच सोन्याचे दिवस सुरु होणार आहेत.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी 14 मार्चपासून चांगला काळ सुरु होणार आहे. या काळात नोकरीत तुम्हाला अनेक संधी मिळतील. तसेच, ऑफिसमध्ये तुम्हाला सहकाऱ्यांचा चांगाल पाठिंबा मिळेल. तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. इतकंच नव्हे तर समाजात तुमची पद-प्रतिष्ठा वाढेल. पार्टनरबरोबर प्रामाणिकपणे तुम्ही संवाद साधाल. तुमचं नातं बहरत जाईल. सूर्याचा राजयोग मिथुन राशीसाठी फार लकी ठरणार आहे.
तूळ रास (Libra Horoscope)
सूर्याचं राशी परिवर्तन तूळ राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक ठरणार आहे. या काळात आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तसेच, जे काम आतापर्यंत होत नव्हतं ते काम लवकरच होण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रयत्नांना चांगलं यश मिळेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. धार्मिक कार्यक्रमात तुमची रुची जास्त वाढलेली दिसेल. या काळात तुमच्या करिअरमध्ये अनेक सकारात्मक बदल घडताना दिसतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: