Kiara Advani Birthday : बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री कियारा अडवाणीचा (Kiara Advani) आज 30 वा वाढदिवस आहे. कियारा तिच्या चित्रपटांमुळे आणि स्टनिंग लूक्समुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर कियारा सक्रिय असते. अनेक सेलिब्रिटी तसेच कियाराचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. जाणून कियाराबद्दल काही खास गोष्टी...


कियारा नाही तर हे आहे खरं नाव
कियारानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, तिचं नाव बॉलिवूडच्या भाईजाननं म्हणजेच अभिनेता सलमान खाननं बदललं. कियाराचं खरं नाव आलिया अडवाणी असं आहे. तिनं 2014 मध्ये 'फगली' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.  


2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटामुळे कियाराला विशेष ओळख मिळाली. अभिनयात पदार्पण करण्याआधी कियारा ही एका प्ले स्कूलमध्ये काम करत होते. त्या काळात तिनं लहान मुलांचे डायपर बदलाचं देखील काम केलं होतं, असं तिनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं. आज कियाराचं नाव बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींच्या यादीमध्ये घेतलं जातं. 


कियारा आहे कोट्यवधींचा मालक 
एका रिपोर्टनुसार कियाराकडे 23 कोटींची संपत्ती आहे. कियारा ही एका चित्रपटासाठी दोन ते तीन कोटी मानधन घेते. कियाराचं मुंबईमध्ये आलिशान घर आहे. या घराची किंमत 15 कोटी आहे. BMW X5, Mercedes-Benz E220D, BMW 530d या लग्झरी गाड्या कियाराकडे आहेत. कियारा ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. कियारा ही सिद्धार्थ मल्होत्राला डेट करत आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. शेरशाह या चित्रपटामधील दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. 


कियाराच्या 'जुगजुग जियो' आणि भूल भुलैय्या 2 या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. लवकरच तिचा गोविंदा मेरा नाम हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये कियारासोबतच विक्की कौशल आणि भूमि पेडणेकर हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 


हेही वाचा: 


In Pics: भूल भुलैयाच्या प्रमोशन साठी कियाराचा नवा लूक; पाहा फोटो!