बॉलिवूडमधील सर्वात रोमँटिक गाणं, बाथटबमध्ये उतरली होती अभिनेत्री, पण लगेच अज्ञातवासात जाण्याची वेळ आली

Kavita Krishnamurthy : देशात नेहमीच वेगवेगळ्या गाण्यांची क्रेझ राहिली आहे. आम्ही तुमच्यासाठी मंदाकिनीपेक्षाही सुंदर असलेल्या अभिनेत्रीचे एक धमाल गाण्याविषयी सांगणार आहोत. सोशल मीडियावर आज देखील या अभिनेत्रीची चर्चा असते.

Continues below advertisement

Kavita Krishnamurthy : भारतात गाण्यांची क्रेझ कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील. गाणी नसतील तर भारतात कोणताही सण अपूर्ण वाटतो आणि पार्टीची सायंकाळ बेरंग होते. त्यामुळे चित्रपटांमध्ये गाण्यांचा समावेश करणे ही काही आजची गोष्ट नाही. अनेक दशकांपासून निर्माते आपल्या चित्रपटांमध्ये एकाहून एक गाणी टाकत आले आहेत आणि त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. कधी एखाद्या सुंदर नायिकेचा झऱ्याखाली बोल्ड अंदाज दिसतो, तर कधी एखादी अभिनेत्री बाथटबमध्ये दिसते. असचं एक गाणं आहे, जे आजचं नाही, तर तब्बल 37 वर्षांपूर्वीचं आहे. जेव्हा एका सुंदर अभिनेत्रीला पाहून प्रत्येकजण तिच्यावर फिदा झाला होता. आजही सोशल मीडियावर तिचा फोटो चर्चेत असतो.

Continues below advertisement

70-80 च्या दशकातील ग्लॅमरस अभिनेत्रींची आठवण काढली, तर मंदाकिनीपासून ते झीनत अमानपर्यंतच्या अभिनेत्री डोळ्यांसमोर येतात. पण अशीच एक अभिनेत्री होती, जिने फक्त एका चित्रपटातून संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली होती. मात्र एका चुकीमुळे ती अभिनेत्री अज्ञातवासात गेली. तिचं बाथटबमधील एक गाणं खूप गाजलं होतं, ज्यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती.

गाण्यातील सर्वात बोल्ड अंदाज

हे गाणं आहे हॉरर चित्रपट ‘वीराना’ मधील. गाण्याचं नाव आहे ‘साथी मेरे साथी’. यामध्ये अभिनेत्री जैस्मिन धुन्ना हिने अफलातून अभिनय केला होता. 90  च्या दशकात तिने आपल्या बोल्ड अंदाजाने सगळ्यांनाच चकित केलं होतं. आजही लोक तिला विसरू शकलेले नाहीत. या गाण्यातही जैस्मिन बाथटबमध्ये खूपच कातिल आणि मोहक दिसते.

‘साथी मेरे साथी’ हे गाणं प्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्ती यांनी गायलं आहे. याचे संगीत दिग्दर्शक बप्पी लाहिरी आहेत. गाण्याचे बोल अंजन आणि इंद्रवीर यांनी लिहिले आहेत. हे एक रोमँटिक आणि बोल्ड गाणं मानलं जातं.

सौंदर्यामुळेच संकट आलं

‘वीराना’ चित्रपटात जैस्मिनने चेटकीणीची भूमिका साकारली होती. ती इतकी सुंदर होती की प्रत्येकजण तिची एक झलक पाहण्यासाठी उतावळा झाला होता. पण काही काळातच ती अज्ञातवासात गेली  आणि चाहते तिचा शोध घेत राहिले.

जैस्मिन धुन्ना गुमनाम झाली

‘वीराना’ नंतर जैस्मिन धुन्नाची फी दुप्पट झाली होती. तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या होत्या. पण काही काळातच ती गायब झाली. असं म्हणतात की तिच्या सौंदर्यावर अंडरवर्ल्डचं लक्ष गेलं होतं. तिला धमकीचे कॉल्स येऊ लागले होते, त्यामुळे तिने चित्रपटसृष्टीपासून दूर होण्याचा निर्णय घेतला. काही लोकांच्या मते, तिची आई खूप आजारी होती, म्हणून तिने झगमगाट सोडून शांत जीवन जगायला सुरुवात केली. आजही ती मुंबईत राहत असल्याचं मानलं जातं, पण तिच्याविषयी कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही.

Sathi Mere Sathi (I) With Lyrics | Kavita Krishnamurthy | Veerana 1988 Songs | Jasmin

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Shibani Dandekar Scold Kapil Sharma Over Marathi Language: मुंबईत राहून तुला मराठी येत नाही? मराठमोळ्या अभिनेत्रींच्या प्रश्नावर कॉमेडियन कपिल शर्मा निरुत्तर

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola